Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सायकलवर निघालेल्या जिल्हाधिकारी यांनाच महिला कॉन्स्टेबलनं अडवून म्हणाल्या 'तुम्ही कुठे जात आहात, घरीच रहा ना, भाई' ; जिल्हाधिकारी तपासणी मोहिमत घडली घटना

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
राजस्थान - राज्यातील भीलवाडा येथे लॉकडाऊनबाबत काय परिस्थिती आहे हे तपासण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी नकाते हे सायकलवरून  कोणताही बंदोबस्त न घेता फिरत होते, यादरम्यान सायकलवरून निघालेल्या जिल्हाधिकारी यांना रस्त्यामध्येच एका महिला कॉन्स्टेबलनं अडवून म्हणाली, कुठं निघालाय भाई ? पण, काही वेळेने वस्तुस्थितीची समोर येताच ती कॉन्स्टेबल महिला घाबरल्याचे जिल्हाधिकारी तपासणी मोहिमत घडली. नाहीतर आपल्या येथील जिल्हाधिकारी पहा.. अनेकांना अजून नाव ही माहिती नाही.
समजलेली माहिती अशी की, वस्त्रनगरी भीलवाडा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणारे लॉकडाउन कालावधीत लॉकडाऊनमध्ये बंदोबस्त तसेच वास्तव काय आहे? हे तपासण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी नकाते हे सायकलवरून कोणताही बंदोबस्त न घेता फिरत होते. परंतु या कलावधीत त्यांना चांगलाच अनुभव आला, तो असा सायकलवरून निघालेल्या जिल्हाधिकारी नकाते यांना  रस्त्यात एका महिला कॉन्स्टेबलनं थाबवले. कॉन्स्टेबल महिलेनं सायकलवर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं कुठं निघालाय ? मात्र, त्यानंतर वस्तुस्थितीची माहिती झाल्यानंतर ती कॉन्स्टेबल महिला  थोडीशी घाबरली, मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी उलट कॉन्स्टेबलच्या कामाचं कौतुक करत 'वेरी गुड' असे म्हणत तुम्ही नेहमी अशा पद्धतीनं सावध असायला हवं, असे म्हटले.
मंगळवारी जिल्हाधिकारी शिवप्रसाद एम. नकाते यांनी शहरातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी सकाळीच सायकलवरून प्रस्थान केले. जिल्हाधिकारी शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, परंतु ते सायकलवरून फिरत असल्याची त्यांना कल्पना नव्हती. या कालावधीत गुलमंडी परिसरातील ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी निर्मला स्वामींनी टी-शर्ट परिधान केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना ओळखलंच नाही आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता अडवून चौकशी केली. महिला पोलिसाच्या तत्परतेमुळं जिल्हाधिकाऱ्यांनाही थांबावंच लागलं.
👉महिला कॉन्स्टेबलने जिल्हाधिकारी नकाते यांना विचारलं, तुम्ही कुठे जात आहात, घरीच रहा ना, भाई. तेवढ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मागून येणाऱ्या बंदूकधारक कर्मचारी म्हटला अहो मॅडम, कुणाला थांबवत आहात... हे सर आहेत. तेवढ्यात जिल्हाधिकारीही सामान्यपणे म्हणाले की, मी डीएम आहे. या प्रकारामुळं काही वेळ महिला कॉन्स्टेबल घाबरून गेल्या. परंतु, जिल्हाधिकारी नकाते यांनी महिला कॉन्स्टेबलसोबत घडलेला हा प्रसंग अगदी सहजतेनं घेत, तिच्या कामाच्या तत्परतेचं कौतुक केले आणि त्यांनी पुढे विविध ठिकाणी जाऊन पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेत आढावा घेतला.
लॉकडाऊनमध्ये सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं.


Post a Comment

0 Comments