Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्रातच कोरोनावर लस !

  ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना सरकार लसीकरणावर भर देताना दिसत आहे. सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्डनंतर आता कोवॅक्सिनची निर्मितीही महाराष्ट्रात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत बायटेकच्या सहयोगी कंपनी बायोव्हॅट प्रायव्हेट लिमिटेडला महाराष्ट्रातील निर्मितीसाठी ताबडतोब मंजूरी द्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

पुण्याजवळील मांजरी खुर्द गावातील 12 हेक्टर जागा ही इंटरव्हेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीला लस तयार करण्यासाठी देण्यात आली होती. पण त्या जागेवर पुढे काही होऊ शकलं नाही. आता ती जागा आपल्याला कोवॅक्सिन लसीची निर्मितीसाठी अनुमती देण्यात यावी. त्याचबरोबर त्यासाठी लागणारे विविध परवाने आणि मान्यता राज्य सरकारकडून देण्यात यावे, अशी मागणी भारत बायोटेकच्या सहयोगी कंपनी बायोव्हेट प्रायव्हेट लिमिटेडने मुंबई उच्च न्यायालयात केली होती.
मांजरी गावातील प्लांटमध्ये सध्या युनिट आणि यंत्रसामग्री सध्या पडून आहे. या युनिटचा कोवॅक्सिन लस निर्मितीसाठी उपयोग केला जाऊ शकतो. तसेच कंपनी या जागेबाबत भविष्यात कोणताही हक्काचा दावाही करणार नाही, भूखंडाचा उपयोग केवळ हे कोवॅक्सिन तयार करण्यासाठीच करण्यात येईल, असं हमीपत्रही बायोव्हेट प्रायव्हेट लिमिटेडने न्यायालयात सादर केलं आहे.
दरम्यान, सरकारी सर्व अटी मान्य असल्यास कंपनीने परवान्यासाठी रितसर अर्ज दाखल करावा, असं सरकारनं सांगितलं आहे. त्यानंतरच सरकार कंपनीला मान्यता देणार आहे.


Post a Comment

0 Comments