Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर स्थापना दिन उत्साहात साजरा

 

नगरचा इतिहास जोपासणे गरजेचे आ.संग्राम जगताप
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - नगर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देशातील अहमदनगर हे एकमेव असे शहर आहे ज्याचा स्थापना दिवस साजरा करता येतो. नगर शहराची स्थापना होऊन आज ५३१ वर्ष पूर्ण झाले आहेत. आपल्या बागरोजा हडकोला मोठा ऐतिहासिक वारसा आहे.आपल्या शहराचा वाढदिवस साजरा करताना मनोमनी आनंद होत आहे.प्रत्येक नागरिकाने शहरा बद्दल आपुलकी व अभिमान बाळगणे गरजेचे आहे, ऐतिहासिक वारसा बरोबर विकसित शहर करण्याचे स्वप्न बाळगले आहे. इतिहास प्रेमी उबेद शेख हे नेहमीच आपल्या इतिहासाचा वारसा जोपासण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

अहमदनगर स्थापना दिनानिमित्त इतिहास प्रेमी उबेद शेख यांच्या माध्यमातून बागरोजा हडको येथील अहमदशहा बादशाह यांच्या कबरीला चादर अर्पण करून अभिवादन करताना आ.संग्राम जगताप यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी,सुहास मुळे,मन्सूर शेख,डॉ.हर्षवर्धन तन्वर आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की,नगर शहराला लाभलेल्या इतिहासाचे जतन करण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केला जाईल बागरोजा हडकोच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून लवकरच या ठिकाणी पुरातन खात्याच्या मान्यतेनुसार बागरोजा हडको चा विकास केला जाईल, बाजरोजहाडको कडे येणारा महत्त्वाचा डीपी रस्ता लवकरच मोकळा केला जाईल असे ते म्हणाले.
यावेळी इतिहासप्रेमी उबेद शेख म्हणाले की, शहराच्या ५३१ व्या स्थापना दिनानिमित्त अहमदशहा बादशाह यांच्या कबरीवर चादर अर्पण करण्यात आली, नगर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे तो जतन करण्याचे काम आम्ही सर्व इतिहास प्रेमी करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments