Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना काळात भाजपाचे खासदार माजीमंत्री यांचे काम दाखवा व एक हजार बक्षीस मिळवा : शहराध्यक्ष सुनील शेलार

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत :- उत्तरेतील व्यक्ती भाजपाला खासदार म्हणून चालते, चेंबूर मध्ये राहणारी व्यक्ती आमदार म्हणून चालतात मग शेजारच्या तालुक्यातील अभ्यासू घनश्याम शेलार यांना नियुक्त केले म्हणून काय बिघडले, आमदार रोहित पवार यांच्या वर आमच्या सर्वाचा विश्वास आहे ते या कठीण काळातही अत्यंत चांगले काम करत असून त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे कर्जत शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सध्या कोरोनाचा अत्यंत भीषण काळ सुरू आहे त्यामध्ये नागरिकांना वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे अशा काळात आ. रोहित पवार हे ग्राउंडवर उतरून काम करत आहेत, भाजपाला उत्तरेतील व्यक्ती खासदार म्हणून चालतो, चेंबूर मध्ये राहणारा व्यक्ती पंधरा वर्षे आमदार म्हणून चालतो मग शेजारच्या तालुक्यातील अभ्यासू घनश्याम शेलार यांना कुकडी पाणी वाटप समिती वर नीयुक्त केले म्हणून काय बिघडले, माजीमंत्री राम शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे होते आपल्या काळात त्यांनी पाच वर्षात कुकडीच्या पाण्याचे समान न्याय वाटप का करून घेतले नाही, आता फक्त सोशल मीडियावर विरोध करून प्रश्न सुटेल का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे कर्जत शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी उपस्थित केला.
कोरोना हे मानव जातीवर आलेले संकट आहे त्यात आपण एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे सध्या राजकारण करण्याची ही वेळ नाही ज्यावेळी राजकारण करायचे त्यावेळी जरूर राजकारण करू पण सध्या जनतेला मदत होईल असे काम करण्याची गरज आहे, आ. रोहित पवार विविध प्रकारचे कामे करत आहेत, याशिवाय गेली पाच वर्षात मंत्री असताना जेवढा निधी आला नाही तेवढा निधी गेली दीड वर्षात आणला आहे, त्याची काही कामे सुरु आहेत, व काही होणार आहेत, तालुक्यात दोन 
कोरोना केअर सेंटर उभारले आहेत, या लोकांच्या सर्व छोट्या मोठ्या बाबी कडे लक्ष ठेवले जात आहे. तालुक्यात आज पर्यंत ऑक्सिजन चा तुटवडा पडलेला नाही व पुढे ही अडचण येऊ नये म्हणून 
दररोज अडीचशे जम्बो सिलेंडर भरतील असा ऑक्सिजन प्लान्टच कर्जत मध्ये उभा करण्याचे काम सुरू आहे, आ रोहित पवार स्वतः जातीने सर्व आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवणे, आरोग्य कर्मचारी कमी पडत असताना थेट बारामती मधून डॉक्टर व कर्मचारी आणणे, मदतीचे आवाहन करत विविध सेवाभावी व्यक्ती, सामाजिक संस्था यांना आवाहन करून मदत मिळविणे, सी एस आर फंड मिळवून त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे, अशा विविध प्रकारचे कामे करत आहेत, भाजपाचे लोक मात्र अशा काळात तालुक्यातील लोकांना मदत करण्या ऐवजी सोशल मीडिया वरून, बातम्या मधूूून दिशाभूल करण्याचे राजकारण करत आहेत, असा घणाघात युवकचे शहराध्यक्ष
विशाल म्हेत्रे यांनी करत विरोधकातील काही मोजके लोक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहन्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, याने जनतेला कोणताही उपयोग होत नाही त्यापेक्षा भाजपाच्या या सर्वानी आमच्या बरोबर ग्राउंड वर खाली उतरून प्रशासनाला सहकार्य करत कोरोनाच्या काळात काम करून दाखवावे नुसत्या गप्पा मारू नये असे आवाहन ही युवकचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे यांनी केले यावेळी सचिन सोनमाळी, पृथ्वीराज चव्हाण, उपस्थित होते.
कुकडीचे पाणी 9 मे रोजी मिळणार होते मात्र हा प्रश्न कोर्टात गेल्याने पाणी सुटले नाही, त्यानंतर 12 तारखेला निर्णय होणार होता मात्र पुन्हा कोणी तरी कोर्टात गेले व 17 तारीख दिली आहे, या दिवशी कोर्टा पुढे योग्य भूमिका मांडू व कोर्टाचा निकाल लागेल त्यामुळे नक्की कुकडीचे पाणी सुटेल असा विश्वास यावेळी उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यानी व्यक्त केला. आ पवार यांनी सीना धरणाचे पाणी सोडले आहे हे विरोधकांना दिसणार नाही व त्यावर ते बोलणार ही नाहीत याकडे ही शेलार यांनी लक्ष वेधले.

👉काम करताना दाखवा व एक हजार मिळवा
कोरोनाच्या या गंभीर काळात फक्त एकदा दौरा केला, कोव्हिडं केअर सेंटरला भेट दिली म्हणजे मदत केली असे होत नाही, त्यासाठी गरज वंताला थेट मदत करावी लागते, भाजपाच्या खा. सुजय विखे व माजी मंत्री राम शिंदे यांनी कोरोना काळात जनतेला काही मदत केल्याचे दाखवून द्या व एक हजार रु राष्ट्रवादी कडून बक्षीस मिळवा अशी घोषणाच शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी केली.

Post a Comment

0 Comments