Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठा आरक्षण 👉 आपले अपयश लपवण्यासाठी प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक. राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये व्यस्त आहे : देवेंद्र फडणवीस

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई- मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे. याबाबत 'आपले अपयश लपवण्यासाठी प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक. राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये व्यस्त आहे. तुम्हाला माहिती नाही का की गव्हर्नरच्या हातात काही नाही. असा सवालही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी (दि.14) मिडिया प्रतिनिधींशी बोलताना मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

मी केंद्राचे अभिनंदन करीतो की, इतक्या जलद गतीने केंद्राने आपली भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. परंतु यासोबतच केंद्राने 50 टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा व याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली. यावर श्री फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला की, सर्वच जर केंद्राने करायचे तर राज्य सरकारने काय माशा मारायच्या का? असा टोलाही लगवला.
102 व्या घटना दुरुस्तीत राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यात आले असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळेच केंद्र सरकारने तात्काळ न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी व आपली बाजू मांडली. त्यामुळे केंद्र सरकारचे आभारी असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.
अन् मिळालेले आरक्षणही घालवायचे असे किती दिवस चालणार असा सवाल उपस्थित करून श्री फडणवीस पुढे म्हणाले, अशोक चव्हाण यांनी कायदा समजून घेऊन व सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकते याबाबत विचार केला पाहिजे.'असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments