Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली - अंमल बजावणी न झाल्यास कंटेमट पिटीशन दाखल करणार : श्रीनिवास बोज्जा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - हॉस्पिटलमधील आयसीओ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश करूनही अंमलबजावणी होत नाही, जर प्रशासनाने अंमलबजावणी करून न घेतल्यास प्रशासना विरुद्ध मे.कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली केली म्हणून कंटेमट पिटीशन दखल करणार अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकान्वये दिली असून मे.सुप्रीम कोर्टाचे जजमेंटची प्रत जिल्हाधिकारीसह इतर प्रशासन अधिकाऱ्यांना पाठवली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच हॉस्पिटल मधील बेड फुल असल्याचे सांगण्यात येते परंतु जर सी सी टी कॅमेरे बसविण्यात आले तर सत्यपरिस्थिती लक्षात येईल. तसेच पेशंटची देखभाल व्यवस्थित होते की नाही याचीही माहिती मिळेल.
वास्तविक पाहता सुप्रीम कोर्टाने दिनांक 19/06/2020 रोजी सुमोटो रिट पिटीशन (सिव्हिल)क्रमांक 7/2020 मध्ये जस्टीस अशोक भूषण, जस्टीस संजय किशन कौल व जस्टीस एम. आर. शहा यांनी आदेश करूनही अदयाप कोर्टाच्या हुकूमाची अंमल बजावणी झाली नाही या आदेशाला एक वर्ष पूर्ण होईल. तरी सुद्धा प्रशासनाने याची दखल घेतली नाही ही शोकांतिका आहे.
साध्यच्या परिस्थितीत कोविड पेशंट ऍडमिट केल्यानंतर हॉस्पिटल कडून कोणते उपचार चालू आहेत याची कोणतीही माहिती पेशंटच्या नातेवाईकांना दिली जात नाही यासाठी जर आय सी ओ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले व त्याचे प्रक्षेपण हॉस्पिटलच्या आवरा मध्ये मोठया स्क्रीन वर दाखवील्यास ज्या पेशंटचे नातेवाईक आहेत त्यांना त्यांच्या पेशंट ची सत्य परिस्तिथी कळू शकेल व त्यामुळे पेशंट चे नातेवाईकांनाही दिलासा मिळेल. 
यासाठी प्रशासनाने तातडीने मा. सुप्रीम कोर्टाचे आदेशाची अंमल बजावणी करून सर्व हॉस्पिटल्स ने त्यांचे आय सी ओ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करून त्याचे प्रक्षेपण हॉस्पिटलचे आवरा मधील मोठया स्क्रीनवर दाखवावे अशी अंमलबजावणी करावी जर असे न झाल्यास सुप्रीम कोर्टाचे आदेशाची पायमल्ली केली म्हणून कंटेमट पिटीशन दाखल करण्यात येईल अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments