Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लवकरच एलईडी पथदिवे बसविण्‍याच्‍या कामास सुरूवात : महापौर बाबासाहेब वाकळे

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - महानगरपालिकेच्‍या वतीने नगर शहरातील ठेकेदारा मार्फत कचरा संकलनाचा निर्णय घेतल्‍या नंतर ख-या अर्थाने आपले शहर कचराकुंडी मुक्‍त झाले याच धर्तीवर शहरामध्‍ये ठेकेदारा मार्फत 35 हजार एलईडी पथदिवे बसविण्‍याचा निर्णय घेतला असून दोन निविदा प्राप्‍त झाल्‍या आहेत. आता दोन्‍ही ठेकेदारांना प्रायोजिक तत्‍वावर कुष्‍ठधाम रोडवर एलईडी पथदिवे बसविण्‍याची मुदत दिली होती ती पूर्ण झाली असून लवकरच एजन्‍सीचा अहवाल आल्‍यानंतर शहरामध्‍ये एलईडी पथदिवे बसविण्‍याच्‍या कामाला सुरूवात होणार आहे.

गेल्‍या अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेला एलईडी पथदिव्‍याचा प्रकल्‍प शहरामध्‍ये साकारण्‍यात येणार असून या माध्‍यमातून मनपाची आर्थिक बचत होणार आहे. तसेच संपूर्ण शहर एलईडी दिव्‍या मार्फत प्रकाशमय होणार आहे. या माध्‍यमातून विजेची बचतही होणार आहे. यासाठी प्रशासनास लवकरात लवकर जी निविदा योग्‍य आहे त्‍यास कार्यारंभ आदेश देण्‍यात यावा व शहरातील पथदिव्‍याचा प्रश्‍न मार्गी लावावा अशा सुचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
    कुष्‍ठधाम रोडवर ई स्‍मार्ट एनर्जी सोल्‍युशन प्रा.लि. कंपनीच्‍या वतीने प्रायोजिक तत्‍वावर एलईडी पथदिवे बसविण्‍याच्‍या कामाची महापौर बाबासाहेब वाकळे व विरोधीपक्ष नेते संपत बारस्‍कर यांनी पाहणी केली. यावेळी विद्युत विभागाचे प्रमुख आर.जी.मेहेत्रे, रावसाहेब चव्‍हाण, गणेशभाऊ बारस्‍कर, पुष्‍कर कुलकर्णी , शुभम वाकळे , अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.    यावेळी विरोधीपक्ष नेता संपत बारस्‍कर म्‍हणाले की, गेल्‍या अनेक महिन्‍यापासून शहरातील पथदिवे बंद असल्‍यामुळे अंधाराचे साम्राज्‍य निर्माण झाले आहे. विद्युत विभागा मार्फत वेळेवर बंद पडलेले पथदिवे बसविण्‍यात येत नाही या अंधारामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत. याच बरोबर चो-यांचे प्रमाणही वाढले आहे लवकरात लवकर पथदिवे बसवावेत यासाठी मनपा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल घेत विद्युत विभागाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. ठेकेदारांमधील वाद न्‍यायालयीन प्रक्रीयेत गेला आता हा वाद मिटून लवकरच एजन्‍सी निश्चित केली जाईल मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप व मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांच्‍या प्रयत्‍नातून एलईडी पथदिव्‍याचा प्रकल्‍प राबविण्‍यात येणार आहे. हा प्रकल्‍प राबवित असताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातून मार्ग काढला जात आहे. घनकच-या प्रमाणेच विद्युत विभागाचा कार्यभार खाजगी ठेकेदारा मार्फत करून घेतला जाईल यामुळे मनपाची आर्थिक बचत होवून विजेची बचतही होईल यामाध्‍यमातून मनपाला  फायदा होईल व शहरही प्रकाशमय होण्‍यास मदत हाईल.  विद्युत विभाग प्रमुख आर.जी.महेत्रे म्‍हणाले की शहरामध्‍ये एलईडी पथदिवे बसविण्‍यासाठी निविदा मागविण्‍यात आल्‍या होत्‍या या दोन ठेकेदरांना प्रायोजिक तत्‍वावर पथदिवे बसविण्‍यासाठी मुदत दिली होती. दोन्‍ही ठेकेदाराने कुष्‍ठधाम रोडवर एलईडी पथदिवे बसविले असून अहवाल आल्‍यानंतर पुढील कार्यवाही सुरू करून. 

Post a Comment

0 Comments