Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'क्रिस्टल हॉस्पिटल' मध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा ; परिचारिकांचा क्रिस्टल परिवारातर्फे गौरव

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर - डॉक्टर्स म्हटले की, त्याला जोडून 'नर्स' (परिचारिका) हे पद आलेच, याशिवाय 'रुग्णालय' हा शब्द पूर्ण होत नाही. रुग्णाच्या स्वतःच्या घरच्यापेक्षा रुग्णालयातील रुग्णास बरे करण्यामागे खऱ्या अर्थाने माणुसकीचा आधार देण्याचे काम डॉक्टर्सबरोबर 'नर्स' (परिचारिका) या करीत असतात. त्यामुळे रुग्णांच्या वेदनावर मायेची फुंकर घालणारे या सर्वच रुग्णालयातील 'नर्स' (परिचारिका) यांना सलाम असे गौरवोद्गार अहमदनगर क्रिस्टल रुग्णालयाचे संचालक तथा मोहाटा श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी काढले.
अहमदनगर झोपडी कॅन्टींग समोरील क्रिस्टल रुग्णालयामध्ये जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून आयोजित छोटाखानी 'नर्स' (परिचारिका) गौरव कार्यक्रमात श्री डाॅ. दराडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 'क्रिस्टल'चे हदयरोग तज्ञ डॉ.जितेंद्र ढवळे पा. हे होते. यावेळी डॉ. जितेंद्र ढवळे पा. यांनी जागतिक परिचारिका दिनाबाबतची माहिती सांगत ते म्हणाले, स्वतःचे दुःख विसरून कोणत्याही रुग्णाचा तिरस्कार न करता रुग्णसेवा करणारी ती 'नर्स' (परिचारिका) असते. यामुळे रुग्ण बऱ्या होण्यामागे मोलाचा वाटा 'नर्स' (परिचारिका) यांचा असतो.
यावेळी 'क्रिस्टल' चे डॉ. प्रदीप फुंदे, गणेश फासले, सौ कांचन पालवे, पंकज पालवे आदिंसह रुग्णालयात रुग्णसेवा करणाऱ्या नर्स (परिचारिका) उपस्थित होत्या.
दरम्यान उपस्थित असणा-या सर्व नर्स (परिचारिका) यांना रुग्णालयातर्फे कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी डॉ. जितेंद्र ढवळे पा., डाॅ ज्ञानेश्वर दराडे व डॉ. प्रदीप फुंदे यांच्या हस्ते कीट देण्यात आल्या.


Post a Comment

0 Comments