Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगांव तालुक्यात खुंटेफळमध्ये आढळा अल्पवयीन मुलाचा मृतदेह ; घातपाताची शक्यता

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव - शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भितीयुक्त खळबळ उडाली आहे. 

सदर घटनेची माहिती शेवगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन. रात्री उशिरापर्यंत खुंटेफळ भागात पोलिसांकडून तपास सुरू होता. सदर घटनेचा पोलीस सर्व बाजूने सखोल तपास करीत आहेत. घटनेचा रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. निष्पाप बालकाशी हा निंदनीय प्रकार कोणी व कोणत्या करणामुळे केला ? याचे कारण तपासानंतरच उघडीस येणार आहे.मात्र या घटनेमुळे खुंटेफळ भागात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास करण हे शेवगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व त्यांचे पथक रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते.
 घातपाताचा संशय 
 खुंटेफळ गावातील सार्थक अंबादास शेळके या 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुलांच्या मानेवर शस्त्र जखमा  दिसून येत आहेत. हा प्रकार अमावस्येला घडला असल्याने घातपाताचा व नरबळीचा प्रकार तर नाहीना ? अशी शंका अनेकांनकडुुन व्यक्त केली जाते आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील श्वान पथकासह घटनास्थळी हजर झाले.  मृतदेह पी. एम. साठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments