Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निऱ्हाळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून 50 हजारांची मदत

 

एम.एम.निह्राळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तालुक्यातील ४ कोविड केअर केंद्रांना ५० हजारांचे सकस आहार तसेच आरोग्य साधनांचे वितरण करताना शाहिद बागवान,महेश दौंड,गणेश वाखुरे,निलेश चव्हाण आदी.
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी – येथील एम.एम.निह्राळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तालुक्यातील कोविड केअर केंद्रांना आवश्यक अन्न तसेच आरोग्य साधनांच्या स्वरुपात 50 हजारांची मदत करण्यात आली आहे.
कायम दुष्काळी परिस्थिती मुळे आधीच अडचणीत सापडलेला शेतकरी कोरोना संकटात सापडला असून कोरोना रुग्ण म्हणून उपचार घेत असलेल्या गरीब रुग्णांना सामाजिक जाणीवेतून २००७ साली एम.एम.निह्राळी विद्यालयातून १२ वी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने 50 हजार रुपयांची कोविड सहाय्यता निधी उभारण्यात आली.या निधीतून शाहिद बागवान,महेश दौंड,गणेश वाखुरे,निलेश चव्हाण तसेच नोकरी बाहेरगावी स्थाईक झालेल्या मित्रपरिवारा कडून शहरातील सुमन कोविड केअर केंद्र, लोकनेते गोपीनाथ मुंढे कोविड केअर केंद्र पाथर्डी,त्रिलोक जैन कोविड केअर केंद्र माणिकदौंडी,आगसखांड येथील गोपीनाथ मुंडे कोविड केंद्र येथील कोरोना रुग्णांना सॅनिटायझर,मास्क,आवश्यक औषधे,शुद्ध पाणी,खजूर,अंडी,सकस आहार, यासह पन्नास गरीब कुटुंबाना किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले.Post a Comment

0 Comments