Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'कोरोना' बरा झाल्यानंतर 3 महिन्यांनी लस ; लस स्तनदा मातांनाही मिळणार

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नवीदिल्ली- 'नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड' च्या लसीकरणाबाबत नवीन शिफारशींना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्यास 3 महिन्यांनंतर लस डोस दिला जाऊ शकतो. यापूर्वी असेही सांगितले जात होते की, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर एखाद्याच्या शरीरात सहा महिन्यांपर्यंत अँटीबॉडी राहातात.
आता गर्भवती मातांना लस देण्याची शिफारसही मान्य करण्यात आली आहे. आतापर्यंत गर्भवती व स्तनदा मातांना लस देण्यात आली नव्हती, कारण अशा महिलांना लसीच्या चाचण्यांमध्ये समाविष्ट केले नव्हते. त्यांच्यासाठी ही लस सुरक्षित आहे की नाही यावर संशोधन चालू होते. त्यांच्याकडे कोणताही सुरक्षा डेटा नव्हता. गर्भवती महिलबाबतच्या लसीकरणाविषयी अद्याप निर्णय नाही. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपबरोबर विचारमंथन केले जात आहे.

केंद्राने दिलेल्या मान्यता दिलेल्या शिफारशी याप्रमाणे--
👉जर एखादी व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त असेल, त्याला हॉस्पिटलायझेशन किंवा आयसीयू आवश्यक असेल तर, त्याला लसीकरणासाठी 4-8 आठवडे थांबावे लागेल, ज्यानंतर त्यांना लस दिली जाईल.
👉लस मिळाल्यानंतर 14 दिवसांनंतर कोणीही व्यक्ती रक्तदान करू शकते. जर एखादी व्यक्ती कोविड पीडित आहे आणि 14 दिवसांनंतर त्याची RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली तर तो देखील ब्लड डोनेट करु शकतो.
👉व्हॅक्सीनेशनपूर्वी कोणत्याही व्यक्तीला रॅपिड अँटीजन टेस्टची गरज नाही.
आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या शिफारसींबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी सूचना देण्यास सांगितले व त्यांच्या पालनासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.
स्थानिक लोकांना ही माहिती स्थानिक भाषेत पोहोचवण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. प्रत्येक स्तरावर लसीकरणात गुंतलेल्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा सल्लाही राज्यांना देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments