Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

युवतीकडून ब्लॅकमेल करून खंडणीची मागणी ; नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ; 3 आरोपी अटक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर तालुक्यात संबंधित महिलेकडून  ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याच्या पहिल्या दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केले असता, दुसराही एक तसाच  एका युवतीने  क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करून खंडणी मागणीचा गुन्हा उघडकीस आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे. या दाखल गुन्ह्यात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यातील आरोपीमध्ये एक पोलिस कर्मचा-याचा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.

नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या यात एका क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. त्या संबंधित अधिकाऱ्याने परिस्थिती लक्षात घेऊन ब्लॅकमेल करून खंडणी मागणा-या टोळीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्या क्लासवन अधिका-याच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या अधिकार्‍याकडे तीन कोटींची खंडणी त्या संबंधित युवतीने मागितली होती. दोन कोटी देण्याचे त्या अधिकार्‍याने कबूल केले होते. त्यातील 80 हजार रूपये त्याने दिले होते. त्यांच्या सोबत नाजूक संबंध ठेवत त्याचा व्हिडीओ शूट केला होता. यामध्ये संबंधित तरूणीसह एजंट अमोल मोरे, सचिन खेसे (रा. हिगंणगाव ता. नगर), सागर खरमाळे, महेश बागले (दोघे रा. नगर) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. सचिन खेसे याला पोलिसांनी अटक केली आहे.


Post a Comment

0 Comments