Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उत्तर प्रदेश ऑक्सिजन प्रकल्पात स्फोट, 3 ठार

रीफिलसाठी आलेल्याचे हात तुटून उंच उडाले
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
लखनऊ - उत्तर प्रदेशच्या राजधानीत बुधवारी (दि.5) एका ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 3 जणांचा जागीच ठार झाले तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही कर्मचारी अजुनही ऑक्सिजन प्लांटमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
लखनऊच्या देवा रोड येथील केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये हा अपघात घडला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पात ऑक्सिजन रीफिल करत असताना गळती झाली आणि स्फोट घडून आला. मृतांमध्ये एक मजूर आणि ऑक्सिजन रीफिल करण्यासाठी आलेली व्यक्ती होती. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश जारी केले आहे.
ऑक्सिजन ब्लास्ट इतका भयंकर होता की रीफिलिंगसाठी आलेल्या व्यक्तीचा एक हात त्याच्या खांद्यापासून तुटून हवेत उडाला. घटनास्थळी उपस्थित असलेले सुद्धा यात जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोरानाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांमध्ये ऑक्सिजनची नितांत गरज आहे. देशभर होणाऱ्या ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यात केंद्र, राज्य आणि प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस ऑक्सिजन संपल्याने कित्येक रुग्णालयांमध्ये मृत्यू होत आहेत. अशात ज्या ठिकाणी ऑक्सिजनचे प्लांट आहेत, त्या ठिकाणी ऑक्सिजन भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या जात आहेत. अशाच रांगा केटी प्रकल्पाच्या बाहेर सुद्धा होत्या. ऑक्सिजन घेणाऱ्यांमध्ये केवळ रुग्णालय स्टाफच नव्हे, तर नातेवाइकांचा देखील समावेश आहे.

Post a Comment

0 Comments