Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरसेवक निखिल वारे यांच्या पुढाकाराने वॉर्ड क्र. 2 नागरिकांची कोविड तपासणी

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- येथील अहमदनगर महापालिकेच्या माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या पुढाकाराने राजुभाऊ बुधवंत मित्र मंडळ व शिवराजे रुद्रा युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त मदतीने प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोविड तपासणी करण्यात आली.
वॉर्ड क्र. 2 मधील सूर्यनगर येथील एकाच कुटुंबातील किरण साठे, पद्मा साठे व निश्या साठे हे सर्व 10 दिवसापासून खूप आजारी आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून उपचार करण्यासाठी पैसे नाही, म्हणून ते घरीच होते. हे राजुभाऊ बुधवंत मित्र मंडळ व शिवराजे रुद्रा युवा प्रतिष्ठान यांना समजले. याबाबत नगरसेवक निखिल वारे यांना फोन करून ही कल्पना दिली. श्री वारे यांनी तातडीने तिथे येऊन त्यांनी डॉक्टरांना बोलून घेऊन त्यांना सर्वांना स्वतः आणि डॉक्टर यांनी त्यांना चेक करून औषदे दिली. त्याची दखल घेऊन त्याची रोजची जेवणाची व्यवस्था केली. अशाच अनेक कुटुंबांना राजुभाऊ बुधवंत मित्र मंडळ आणि शिवराजे रुद्रा युवा प्रतिष्ठानच्या मदतीने नगरसेवक निखिल वारे यांनी मदत केली आहे.


Post a Comment

0 Comments