Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिलेने वादातून चिमुकल्यांना गच्चीवरुन फेकून स्वतः मारली उडी ; 14 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
औरंगाबाद- शेजारी महिलेबरोबर किरकोळ कारणातून झालेल्या वादातून तिला अद्दल घडवण्यासाठी 14 महिन्यांचा मुलगा व 3 वर्षेच्या मुलीसह महिलेने स्वतः दुसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक रविवारी औरंगाबादमधील बजाजनगर येथील जिजामाता हौसिंग सोसायटीत दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या घटनेमध्ये महिला व 3 वर्षेची मुलगी गंभीर जखमी झाली, तर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी वाढदिवस साजरा केलेला चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, बारलोणी (जि.सोलापूर) या गावाचे सतीश नागनाथ आतकर ( वय 27) हे कुटुंबियांसह वाळुज येथे कामानिमित्त येऊन स्थायिक झाले होते. वडगाव गट नंबरमधील एका एजन्सीवर काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मागील काही दिवसांपासून आरएक्स-12 जिजामाता कॉलोनी येथील गायकवाड यांच्या घरात ते भाड्याने खोली घेऊन राहत होते. त्यांच्या शेजारी इतरही भाडेकरू राहतात.
घटनेच्या दिवशी शेजारील महिलेसोबत लहान मुलांच्या कारणावरून किरकोळ वाद झाल्याने महिलेने शेजारणीला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने अवघ्या 14 महिने वयाच्या सोहमला गच्चीवरून खाली फेकले लगेच तीन वर्षीय प्रतीक्षाला सुद्धा वरून खाली फेकले त्यानंतर स्वतः सुद्धा उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात अनिता आतकर (23) यांच्या डोक्याला व दोन्ही पायाला तर प्रतीक्षाच्या पायांना गंभीर दुखापत होऊन ती जखमी झाली. तर सोहमच्या डोक्याला मार लागल्याने त्याला उलटी होऊन अवघ्या काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अभिजित गायकवाड, मनोज जैन, रवी शर्मा आदींनी रुग्ण वाहिकेने महिलेला घाटीत उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून महिती घेतली.Post a Comment

0 Comments