Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एअरस्ट्राइक असोसिएट प्रेस, अल जजीरासह अनेक मीडिया समुहाचे ऑफिस असणारी 12 मजली इमारत उध्वस्त

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
तेलअवीव -'इद्राइल डिफेंस फोर्स'ने शनिवारी (दि.15) राञीच्या सुमारास एअरस्ट्राइक असोसिएट प्रेस, अल जजीरासह अनेक मीडिया समुहाचे ऑफिस असणारी 12 मजली इमारत उध्वस्त केली. या हल्ल्यात 'आयडीएफ' ने रहिवासी भागातील नागरिकांना हलविण्यात आले आहेत. इस्त्रायली लढाऊ विमानांनी बॉम्बफेक फेकल्याने काही क्षणात इमारती उध्वस्त झाल्या. यापूर्वी इस्रायल व हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये 126 नागरिक ठार झाले आहेत. यामध्ये 31 मुलांचा समावेश आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यांमध्ये 950 हून अधिक लोक जखमी असून, मयतांमध्ये 9 जण इस्त्रायली व बाकीचे पॅलेस्टाईन आहेत.
👉हमासने 2 हजार 300 रॉकेट फेकले
IDF ने निवेदन जारी करुन सांगितले की, शुक्रवारी रात्री 7 ते शनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंत गाझा पट्टीवरुन 200 रॉकेट इस्रायलवर सोडण्यात आले. यामधून 100 पेक्षा जास्तला आयरन डोमने हवेत हाणून पाडले. हे इस्रायलच्या लोकवस्तीच्या क्षेत्रात पडणार होते. 30 मिसफायर होऊन गाझावरच पडले. सीरियाच्या बाजूनेही शनिवारी 3 रॉकेट इस्राइलवर डागण्यात आले. त्यातील एक मिसफायर होऊन सीरियामध्येच पडला. आतापर्यंत हमासने 2300 रॉकेट इस्राईलवर सोडली आहेत.
इज्राइल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये झपाट्याने दंगली पसरत आहेत. पॅलेस्टाईनच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी दंगलीत सुमारे 9 जण ठार झाल्याचे सांगितले. IDF ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गाझानंतर आता पश्चिम बँककडून इस्राईलमध्ये दगड आणि बॉम्ब टाकण्यास सुरुवात झाली आहे. आयडीएफच्या म्हणण्यानुसार या दंगलीत 3,000 हून अधिक पॅलेस्तिनी सहभागी आहेत. सर्वात जास्त दंगलीची प्रकरणे यरुशलम, लॉड, हाइफा आणि सखानिन शहरांत नोंदवण्यात आली आहेत. गोष्टी इतक्या वाईट झाल्या की लॉड शहरात आणीबाणी लागू करावी लागली. 1966 नंतर दंगलीमुळे आणीबाणी लागू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
युएन सुरक्षा परिषदेची रविवारी बैठक 
इस्रायल-पॅलेस्टाईनच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुतेरेस यांनी रविवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाची बैठक बोलावली आहे. त्यांनी या मुद्द्यावर शक्तिशाली देशांच्या मौनावर दुःख व्यक्त केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रवक्ते स्टीफन दुजा दुजारिक म्हणाले, 'दोन्ही देशांमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगाने संघटित झाले पाहिजे. या विषयावर राजकीय तोडगा निघाला पाहिजे. यापूर्वी, अमेरिकेने गुरुवारी होणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या बैठकीला बंदी घातली होती. चीनच्या वतीने ही बैठक बोलवण्यात आली होती. पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी संयुक्त राष्ट्र संघाला या विषयावर हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments