Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात 10 वर्षापासून सिस्टर नाही, म्हणून उपचार नाही ; स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / बाबा ढाकणे 
पाथर्डी - डोंगरदऱ्यातील गावांचे वाड्या-वस्त्यावरील नागरिकांची आरोग्याची समस्या सुटण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शासनाने सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ या डोंगरातील गावात अनेक वर्षापासून अस्तित्वात आलेल्या 'प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे फक्त नावालाच आहे' की काय ? अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी 'नगर रिपोर्टर' शी बोलताना दिली.

चिंचपूर पांगुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली 10 वर्षापासून सिस्टर नाही. तर डॉक्टर आहे परंतु तोही कधी मध्ये दिसतो. सिस्टर नसल्याच्या कारणास्तव या ठिकाणी स्थानिक नागरिकांना आरोग्याची सेवा मिळत नाही. वास्तविक या उपकेंद्रावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी असणारी 'आया' या कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षापासून पगार वाढ नाही. मागील करोनोच्या काळात मिळालेली रक्कम अद्यापही तिच्या हातात पडली नाही. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कारभाराची अधिक चौकशी केल्यास मोठा सावळागोंधळ बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षा यांनी या चिंचपूर पांगुळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कारभाराकडे जातीने लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

👉 पंकजाताई मुंडे यांना मानणारा हा परिसर पण रस्त्यांची दयनीय अवस्था ; निराशाजनक नागरिकांच्या प्रतिक्रीया - चिंचपूर पांगुळ परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांना मानणारा वर्ग आहे. त्याचे शासन दरबारी मोठे वजन असतानाही श्रीमती मुंडे यांचा चिंचपूर पांगुळ या भागाला काही उपयोग झाला नाही. या परिसरात अजूनही रस्त्याची दयनीय अवस्था आहे. अनेक मूलभूत समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. स्थानिक पुढारी, राजकारणी समस्याबाबत प्रशासकीयस्तरावर निवेदन अथवा अर्ज केल्यास संबंधित त्यांना धमक्या देतात व त्रास देण्याचा प्रयत्न करतात, अशी काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
👉अद्यापही जि.प. व पं.स.सदस्य कोण? स्थानिक नागरिकांना माहिती नाही ! - जिल्हा परिषदेचा या गटाचा सदस्य व पंचायत समिती गणाचा सदस्य कोण असे अनेक नागरिकांना प्रश्न विचारले असता, आम्हाला ही दोन्ही सदस्य माहिती नाहीत, पण ते दिसायला कसे आहेत. इकड निवडून गेले की, पुन्हा पुढाच्या निवडणुकीत दिसतात. डोंगर द-याचा परिसर असल्याने येथील समस्यांकडे स्थानिक राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकारी यांची तर मिलीभगत आहेच, परंतु दुर्लक्ष नेहमीच असते, अशी स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments