Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

10 आठवडे वाढल्यानंतर गेल्या 2 आठवड्यांमध्ये कमी झाले रुग्ण ; 7 राज्यांत धोकाच..

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नवीदिल्ली - भारतात कोरोनाबाबत दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रकरणात सलग 10 आठवड्यांनंतर गेल्या 2 आठवड्यांपासून घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये नवीन रुग्णांमध्ये 3.82% ची घट झाली आहे. तर मृतांचा आकडा 1.07% वर गेला आहे. तर 7 राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 25% पेक्षा जास्त आहे. तर 22 राज्यांमध्ये हा आकडा 15% पेक्षा जास्त आहे.कोरोना 6 राज्यांमध्ये कमी 
तर 7 राज्यांत धोका कायम
काही आठवड्यापासून महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात व छत्तीसगड या ६ राज्यांत रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच मागील काही आठवड्यांत तामिळनाडू, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, सिक्किम आणि मिझोराम या ७ राज्यांत पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत.
👉रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले 
आरोग्य विभागाचे जॉइंट सेक्रेटरी लव अग्रवाल म्हणाले की, गेल्या 24 तासांमध्ये देशभरात 2,76,000 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यामधून 77% प्रकरणे 10 राज्यांमधून आहेत. तर एकूण सक्रिय प्रकरणांच्या 69% केवळ 8 राज्यांमध्ये आहेत. 21 राज्य असे आहेत जेथे दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे.
अग्रवाल यांनी सांगितले की, देशभरात 3 मे रोजी सक्रिय प्रकरणे 17.13% होते, ते आता 12.1% च राहिले आहेत. रिकव्हरी रेट 81.7% ने वाढून 86.7% झाला आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये सक्रिय प्रकरणे आणि रिकव्हरी प्रकरणांची तुलना केल्यास 10 मधून 9 दिवसांत रिकव्हरी प्रकरणे जास्त नोंदवण्यात आली आहेत.
👉आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, एका संशोधनानुसार, 50 टक्के नागरिक अजुनही मास्क घालत नाहीत. 64 टक्के नागरिक असे आहेत जे केवळ आपले तोंड झाकतात, मात्र नाक झाकत नाहीत. एकूण मिळून 14 टक्केच लोक असेत आहेत. जे योग्य प्रकारे मास्क घालतात.
जूनपर्यंत 45 लाख करण्याचे आमचे लक्ष्य
आयसीएमआरचे महानिदेशक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, आमचे लक्ष्य या महिन्याच्या अखेरपर्यंत 25 लाख टेस्ट आणि जूनच्या अखेरपर्यंत 45 लाख टेस्ट करण्याचे आहे. त्यांनी म्हटले की, भारतात फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना संबंधीत चाचण्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 12 आठवड्यांमध्ये यात 2.3 टक्क्यांची वाढ झाली आहे.
भार्गव म्हणाले की, एका कंपनीने कोरोना होम टेस्टसाठी यापूर्वीच अर्ज केला आहे आणि 3 रांगेत आहेत. पुढील आठवड्यात आमच्याकडे आणखी 3 कंपन्या असाव्यात. भार्गव पुढे म्हणाले की, देशात जास्तीत जास्त रॅपिड टेस्ट घेण्यात याव्यात. याचे दोन फायदे आहेत, एक - वेगवान परिणाम प्राप्त होतील आणि दुसरे म्हणजे, रुग्णाला पटकन आयसोलेट केले जाऊ शकते.
भार्गव म्हणाले की पहिल्या टप्प्यात तुम्हाला केमिस्टकडून टेस्ट किट खरेदी करावी लागेल, तर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. तिसर्‍या चरणात घरीच चाचणी करा. चौथ्या चरणात मोबाइल इमेजवर क्लिक करा आणि अपलोड करा, मग आपल्याला निकाल दिला जाईल. ते म्हणाले की 3-4 दिवसात हे बाजारात उपलब्ध व्हावे.
430 जिल्ह्यात दररोज 100 हून अधिक प्रकरणे
28 एप्रिल ते 4 मे या कालावधीत 531 जिल्ह्यात 100 हून अधिक नवीन रूग्ण सापडत होते. जे 12 मे ते 18 मेच्या दरम्यान कमी होऊन 430 जिल्ह्यांमध्येच राहिले आहेत. म्हणजेच 101 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज 100 पेक्षा कमी झाली आहे.
देशभरात विक्रमी 20.55 लाख टेस्ट
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी टेस्टिंग-ट्रेसिंग वर जोर दिला जात आहे. हे पाहता बुधवारी विक्रमी 20.55 लाख टेस्टिंग झाल्या. मंगलवारीही देशभरात विक्रमी 20 लाख 8 हजार 296 कोरोना टेस्ट करण्यात आल्या. हे केवळ भारतातच नाही, त जगात एका दिवसात केलेल्या टेस्टचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 11 मे रोजी 19 लाख 83 हजार 804 टेस्ट करण्यात आल्या होत्या. देशभरात टेस्टिंगचा आकडा 32 कोटींच्या पार गेला आहे.
आतापर्यंत 18.70 कोटी लोकांना
 लस देण्यात आली
देशात आतापर्यंत 18.70 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या व्हॅक्सीन ड्राइव्ह अनुसार आतापर्यंत 96 लाख 85 हजार 934 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, 66 लाख 67 हजार 394 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाइन वर्कसमध्ये 1 कोटी 46 लाख 36 हजार 501 लोकांना फर्स्ट डोस आणि 82 लाख 56 हजार 381 लोकांना सेकंड डोस देण्यात आला आहे.
18+ पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आतापर्यंत 70 लाख 17 हजार 189 लोकांना पहिली लस देण्यात आली आहे. 45 ते 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 5 कोटी 83 लाख 47 हजार 950 लोकांना पहिला डोस आणि 94 लाख 36 हजार 168 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 5 कोटी 49 लाख 36 हजार 96 लोकांना पहिला डोस आणि 1 कोटी 80 लाख 26 हजार 179 लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments