Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रिझर्व्ह बँकेने दरामध्ये केले नाहीत बदल, तुमचे घर आणि ऑटो लोनचा EMI पहिल्या एवढाच राहणार

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
देशातील वाढत्या कोरोनाची स्थिती पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच RBI ने व्याज दरात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेपो दर 4% आणि रिव्हर्स रेपो दर 3.5% राहतील. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली 5 एप्रिलपासून जारी तीन दिवसीय मुद्रा धोरण समितीची (MPC) बैठक झाली. आरबीआयचे गव्हर्नर यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. नवीन आर्थिक वर्षाची (2021-22) ही MPC ची पहिली बैठक होती.

RBI च्या सध्याच्या दरांमध्ये कोणताही बदल नाही - RBI दर दोन महिन्यांनी व्याज दरावर निर्णय घेते. हे काम 6-सदस्य चलनविषयक धोरण समिती (MPC) करते. गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर आमचे लक्ष आहे. म्हणूनच अकोमोडेटिव स्टांस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी MPC ची फेब्रुवारीमध्ये बैठक झाली. 5 फेब्रुवारी रोजी RBI ने रेपो दरात कोणताही बदल न करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी मेपासून RBI ने पॉलिसीचे दर समान ठेवले आहेत. हे दर गेल्या 15 वर्षातील सर्वात कमी स्तरावर आहे. बँकांना दिलेल्या कर्जावरील रिझर्व्ह बँकेकडून घेतल्या जाणाऱ्या व्याजाला रेपो रेट असे म्हणतात. तसेच, बँकांनी जमा केलेल्या रुपयांवर आरबीआयकडून दिल्या जाणाऱ्या व्याजाला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

अर्थव्यवस्थेत प्रचंड वाढीचा अंदाज  - MPCने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी वाढीचा 10.5% अंदाज लावला आहे. फेब्रुवारीमध्येही वाढीवर हाच अंताज होता. 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ 22.6% असेल असा अंदाज आहे. दुसर्‍या तिमाहीत ते 8.3% राहहू शकतो. गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, जगभरात आर्थिक वाढीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहेत, परंतु त्यामध्ये अजूनही अनिश्चितता आहे. लसीकरणाची गती जसजशी तीव्र होते तसतसे जागतिक अर्थव्यवस्था सुधारेल. अर्थव्यवस्थेत सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

महागाईवर दिला अंदाज - 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत किरकोळ महागाई दर 5% होईल, अशी आरबीआयची अपेक्षा आहे. तसेच आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमारीसाठी रिटेल महागाई 5.2% राहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये 4.4% आणि चौथ्या तिमाहीमध्ये 5.1% राहण्याची शक्यता आहे. शक्तीकांत दास म्हणाले की, शक्तीकांत दास म्हणाले की खाद्यपदार्थाची महागाई ही नैऋत्य मॉन्सून आणि पेट्रोल आणि डिझेलवरील करांवर अवलंबून असेल.

Post a Comment

0 Comments