Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डीवायएसपी भाऊसाहेब ढोले याना पोलीस महासंचालक पदक जाहीर

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील सुपुत्र पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. पदक जाहीर होताच त्यांचे राहते गाव दुलेचांदगाव येथे व पाथर्डी,नगर येथे आंनद व्यक्त करण्यात आला.डी.वाय. एस.पी ढोले यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

२०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पोलीस उपअधीक्षक पदासाठी निवड झाल्यानंतर १ वर्ष नाशिक येथील पोलीस अकॅडमी मध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी स्वतः च्या पसंतीने गडचिरोली सारख्या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आशा जिल्ह्यामध्ये काम करण्यास सुरुवात केली.उत्कृष्ट नियोजन करत त्यांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले.अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.पाच महिन्यापूर्वी ढोले यांच्या नेतृत्वाखालील सी-सिक्सटी कमांडो पथकाने पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.गेल्या दोन वर्षांच्या त्यांच्या कालावधीमध्ये अनेक नक्षलवादी शरण आले तसेच अटक करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments