Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सलूनवाल्याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू ; संतप्त नातेवाईकांचा पोलिस ठाण्यापुढे ठिय्या

 ....

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्रात पुढील 15 दिवसांमध्ये संचारबंदीची जाहीर केली आहे. तसेच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमध्ये जीवनाश्यक वस्तूंचे दुकान उघडण्यास मुभा आहे. मात्र, या नियमांच्या विरुद्ध जाऊन औरंगाबादेत एका सलूनवाल्याने निर्बंध डावलून सलून दुकान उघडले. त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली. यात सलूनवाल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत सलूनवाल्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मयत फिरोज खान याने आज (बुधवारी) सकाळी सलून दुकान उघडले होते. पण महाराष्ट्रातील कडक निर्बंधांनुसार सर्व सलून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उस्मानापुरातील सलून व्यवसायिकाने सलून उघडल्याची पोलिसांना माहिती मिळाली. यावेळी त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी सलून दुकानावर आल्यावर सलूनवाल्यास बेदम मारहाण केली. या मारहाणी दरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला, असा आरोप उस्मानापुरा परिसरातील नागरीक व मयत सलूनवाल्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
घटनेनंतर सलून चालकाच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झाले. ते सलून चालकाचा मृतदेह घेऊन उस्मानापूर पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाले. तिथे त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. सलून व्यवसायिकाची हत्या करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी आणि उस्मानापूर परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं.Post a Comment

0 Comments