ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नगर रिपोर्टर
सरकारने आरोग्य सेवा आणि फ्रंटलाइन कामगारांच्या लसीकरणाच्या नवीन नोंदणीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने मार्गदर्शक सुचनांच्या उल्लंघनानंतर कठोर पाऊले उचलत तसे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगाराच्या नावावर इतरही काही लोक लसीकरणासाठी नोंदणी करत होते. परंतु, ते निकषात बसत नसल्यामुळे केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
45 वर्षावरील लोकांची नोंदणी सुरु राहील
राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाला लिहलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण सांगितले की, देशात 45 वर्षावरील लोकांची नोंदणी CoWIN या पोर्टलवर सुरुच राहणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आरोग्य कर्मचारींच्या नोंदणीची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी तर फ्रंटलाइन कामगारांची 6 मार्चपर्यंत होती. शनिवारी राष्ट्रीय तज्ञ समूहाच्या (एनईजीव्हीएसी) झालेल्या बैठकीत राज्य प्रतिनिधी आणि तज्ञांशी यावर चर्चा करण्यात आली होती. दरम्यान, त्यामध्ये या गटाने नवीन नोंदणी बंद ठेवण्याची शिफारस केली होती.
0 Comments