Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दुचाकी चोर जेरबंद ; तोफखाना 'डीबी' ची कारवाई

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - वाढत्या दुचाकी चो-यांच्या पार्श्वभूमीवर शोध मोहीम सुरू असताना दोन दिवसापूर्वी दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात तोफखाना पोलीस ठाण्याच्या 'डिबी' पथकाला यश आले आहे. गणेश देविदास नल्ला (वय 23, रा. श्रमिकनगर बालाजी मंदिराजवळ अहमदनगर), प्रवीण रावसाहेब भोंडगे (वय 27 रा. एमआयडीसी अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.


याबाबत समजलेली माहिती अशी की, मागील काही दिवसांपूर्वी तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी झालेल्या घटनेबाबत दाखल गुन्ह्याचा तोफखाना पोलीस तपास करीत होते. या दरम्यान तोफखाना पोलीस तपोवनरोडने पेट्रोलिंग करीत असताना दोनजण विना नंबर पॅशन प्रो दुचाकीवर औरंगाबाद रस्त्याच्या दिशेने जात होते. त्यांना थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या दोघांना तोफखाना पोलीस ठाण्यात आणून पोलीस खाक्या दाखवताच गाडी ही दोघांनी रंगारगल्ली इथून चोरली आहे. तर नल्ला याने तोफखाना हद्दीत एक स्प्लेंडर, स्कूटर, मोबाईल चोरल्याची कबुली दिली. हा सर्व मुद्देमाल आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या सूचनेनुसार 'डिबी'चे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोह डी.बी जपे, पोना वसीम पठाण, अविनाश वाकचौरे, अहमद इमानदार, पोना सचिन जगताप आदींच्या पथकाने ही कारवाई केली

Post a Comment

0 Comments