Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पञकार दातीर खून प्रकरणी दोघे जेरबंद ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - राहुरी येथील मल्हारवाडी रोड येथून पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी दोघा आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. लाल्या उर्फ अर्जुन विक्रम माळी (वय 25 रा, जुने बसस्थानक जवळ एकलव्य वसाहत,राहुरी), तौफिक मुक्तार शेख (वय 21 रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.


याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 6 एप्रिल 2019 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पत्रकार रोहिदास रघुजी दातीर (रा. उंडेवस्ती, मल्हारवाडी रोड राहुरी) हे त्यांच्या एक्सेस स्कुटी (एमएच 12 जेएच 4063) या दुचाकी गाडीवरून राहुरी इथून मल्हारवाडी रस्त्याने त्यांच्या घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडी येऊन पत्रकार दातीर यांना गाडीत बसून त्यांचे अपहरण केले होते. या घटनेबाबत सविता रोहिदास दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुरी पोलीस ठाण्यात भादवि कलम 363, 341 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी रोहिदास दातीर यांचे अपहरण करून खून केल्याने या घटनेबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या दाखल गुन्ह्याचा तपासकामी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतंत्र पथके आरोपीच्या शोधासाठी पाठवली होती.दरम्यान खबऱ्याकडून व तांत्रिक तपासामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपीबाबत खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी राहुरी, शिर्डी, कोपरगाव, येवला, निफाड या परिसरात शोध घेऊन आरोपी माळी व शेख या दोघांना शेरी चिखलठाण (राहुरी ) व निफाड (जि. नाशिक) अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. आरोपींना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा त्याचे साथीदार कान्हू मोरे (रा. वांबोरी ता.राहुरी) व अक्षय कुलथे (रा. राहुरी ) अशा मिळून केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर पोलीस अधिकारी संदीप मिटके, संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिलेल्या सूचनेनुसार नुसार राहुरी पोलीस ठाण्याचे पोसई गणेश शेळके, निलेशकुमार वाघ, पोकाॅ रवींद्र मेढे, अजिनाथ पाखरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि मिथुन घुगे, सोमनाथ दिवटे, पोहेकाँ विष्णू घोडेचोर, मनोहर गोसावी, पोना सुरेश माळी, सचिन आडबल, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, कमलेश पाथरूट, शिवाजी ढाकणे, रोहित येमूल, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, पोना फुरकान शेख, चापोहेकाँ बबन बेरड, उमाकांत गावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments