Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कोरोना हवेतून पसरतो, हे केंद्र सरकारने मान्य केले आहे. निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी सोमवारी याबाबत सांगितले. परंतू, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने म्हटले की, कोरोनाची दुसरी लाट आधीपेक्षा कमी धोकादायक आहे.
तरुणांच्या संक्रमणात जास्त वाढ नाही - वीके पॉल यांनी सांगितले की, मागच्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या लाटेत जितके संक्रमित झाले, त्यात 30 पेक्षा कमी वय असलेले 31% होते. यंदाच्या लाटेत 32% आहेत. 30 ते 45 वयोगटातील 21% आहेत. मागच्या वर्षीदेखील इतकेच होते. यावरुन असे दिसते की, दुसऱ्या लाटेत तरुणांमधील संसर्ग जास्त वाढत नाहीये. ICMR चे डीजी बलराम भार्गव यांनी सांगितले की, मागच्या वर्षी आलेली लाट जितकी धोकादयक होती, त्या तुलनेत यंदाची लाट कमी धोकादायक आहे. ICMR आणि निती आयोगाने हे मेडिकल जर्नल लँसेटच्या रिपोर्टच्या हवाल्याने सांगितले आहे. लँसेटने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, WHO आणि दुसऱ्या आरोग्य संस्थांना या विषाणूचा इतर पद्धतीने सामना करावा लागेल.

Post a Comment

0 Comments