Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाग्रस्त रूग्णांवर मोफत उपचार व्हावेत, गांव तिथे विलगीकरण कक्ष सुरु करावा ; मानवाधिकार अभियानाची मागणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- कोरोनाग्रस्त सर्व रूग्णांवर मोफत उपचार करणेबाबत तसेच गांव तिथे विलगीकरण कक्ष सुरु करण्यात यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे मानवाधिकार अभियानचे अध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी केली आहे.

कोरोना सुरू असलेली दुसरी लाट अत्यंत भयंकर असून यामध्ये मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. बहुतांश रुग्ण हे योग्य वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तर काहीजण उपचारासाठी पैसे नसल्याने मरत आहेत. कोरोनावरील उपचार मोफत केल्यास सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक ताण पडणार नाही. उपचारासाठी लागणाऱ्या पैशांच टेन्शन घेऊन तसेच पैशामुळ घरीच साधे उपचार घेऊन आजार वाढल्याने मृत्यूमूखी पडणारांचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे, जर कोरोनावरील उपचार मोफत केल्यास किमान पैशांमुळ कोणी मरणार नाही. आणि कोरोनाची भिती देखील कमी होण्यास मदत होईल. गरीब काळजीने मरत आहेत, याचे प्रमाण कमी होईल. याचा विचार होऊन योग्य ते निर्णय घेण्यात यावेत, ही नम्र विनंती.
तसेच, गांव तिथे विलगीकरण कक्ष ही संकल्पना राबविल्यास मोठ्या दवाखान्यांवरील ताण कमी होईल, सदरचे विलगीकरण कक्ष हे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत व स्थानिक नागरिकांच्या मदतीने चालविण्यात यावे जेणेकरुन ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळेल व कोरोना पॅाझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर येणारा तणाव गावातच उपचार मिळाल्याने मन प्रसन्न राहून लवकर बर होण्यास नक्कीच मदत होईल, त्यामुळे “गांव तिथे विलगीकरण कक्ष” ही संकल्पना राबविण्याबाबत विचार व्हावा, असे निवेदनात केली आहे.

Post a Comment

1 Comments