Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाच्या काळात 'खा लंवग' आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा !

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
लवंग… मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा हा पदार्थ स्वाद वाढवण्यासाठी तर उपयोगी आहेच, मात्र हा आरोग्यासाठी देखील लाभदायक असल्याचं आयुर्वेदानं आपल्याला कित्येक वर्षे आधीच सांगून ठेवलं आहे. दिवसभरात फक्त दोन लवंग खाल्ल्याने अनेक फायदे होतात. यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात खा लंवग आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा…
आपल्या शरीरात रोगांशी लढण्याचं काम करते आपली रोगप्रतिकार शक्ती, ही शक्ती वाढवण्यासाठी लवंग अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्याचं काम लवंग करते, ज्यामुळे शरीर कुठल्याही रोगाशी अधिक ताकदीने लढू शकते. याशिवाय लवंगमध्ये विटामीन सी देखील आढळून येतं, जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.

लवंगमध्ये वेदनाशामक घटक देखील समाविष्ट असतात, दातांमध्ये सूज आल्यास किंवा दात दुखू लागल्यास ते अधिक प्रभावीपणे काम करते. यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे दातांमध्ये होणारं संक्रमण रोखलं जातं. जर तुमचे दात दुखत असतील तर ज्या जागी दुखत आहे तिथं लवंग ठेवा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल, याशिवाय रोज दोन लवंग खाल्ल्यास दातांच्या दुखण्यांपासून तुम्ही दूर राहू शकता.
अनेक लोकांना पचनाचा त्रास होतो. काही लोकांची पचनशक्ती चांगली नसते, तर कधी कधी खाल्लेल्या अन्नावर देखील या गोष्टी अवलंबून असतात. अशावेळी लवंग तुमची मदत करु शकते. लवंगमध्ये पाचकरस असतो जो अन्न पचवण्यासाठी मदत करतो. याशिवाय लवंगमध्ये फायबरची मात्रा देखील मोठ्या प्रमाणात असते, यामुळे पोट साफ न होणं, गॅसेस तसेच पोटदुखी सारख्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

लवंगमध्ये पॉलिफेनोल्स नावाचा एक घटक असतो, जे एक मायक्रोन्यूट्रिएंट असून शक्यतो वनस्पतींपासून मिळते. शरीरातील कोलेस्टेरॉल तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी याची मदत होते. रक्तवाहिन्यांना लवचिक बनवून त्यांना अधिक कार्यक्षम बनवतात. डायबिटीजच्या रुग्णांसाठी लवंग वरदान मानली जाते. शरीरात इंन्युलीन प्रमाणे ती काम करते. याशिवाय शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवून ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचं काम देखील लवंग करते.
ब्युनर्स एयर्स विश्वविद्यापीठात करण्यात आलेल्या एका संशोधनात काही गंभीर बॅक्टेरिया जसे की ई कोलाई आणि स्टोफिलोककस यांविरोधात लवंगेचा प्रयोग करण्यात आला. लवंग तेल हे बॅक्टेरिया नष्ट करत असल्याचं या संशोधनातून समोर आलं. चहाच्या झाडाचं तेल, लवंग आणि तुळशीचा एकत्रित वापर करुन हर्बल माऊथवॉशप्रमाणे ते वापरलं जाऊ शकतं. हा नैसर्गिक माऊथवॉश जबड्यासाठी फायद्याचा आहे. २१ दिवस या मिश्रणाचा वापर केला तर बॅक्टेरिया तसेच जबड्यांच्या आजारातून आराम मिळतो.
आपल्यापैकी अनेकांना डोकेदुखीचा त्रास कधी ना कधी सतावत असतो. अशावेळी पुन्हा एकदा लवंगेचा वापर केला तर आपल्याला डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो. यामध्ये दोन प्रकारे आपण लवंगेचा वापर करु शकतो. लवंगेच्या पावडरसोबत चिमूटभर मीठ दुधात टाकून घेणे किंवा नारियल तेलात लवंगेची पावडर भिजत ठेवायची आणि काही काळानंतर जो भाग दुखतो त्या भागावर ती लावायची यामुळे डोकेदुखी थांबण्यास मदत होते.
लवंगमध्ये फ्लेवोनोईड, मँगनीज तसेच यूजेनॉल सारखे काही महत्त्वाचे घटक असतात जे हाडं तसेच आपल्या साध्यांसाठी महत्त्वाचे असतात. लवंग ही स्वास्थ्य खनिजं आपल्या हाडांपर्यंत पोहोचवून त्यांना मजबूत बनवण्याचं काम करते. याशिवाय लवंग तेलाचा वापर देखील महत्त्वाचा आहे, हाडं तसेच सांधेदुखीवर याचा चांगला वापर होतो.
लिवर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या शरीरशुद्धीसाठी काम करत असतो. लवंग आपल्या लीवरसाठी देखील अत्यंत फायद्याची असल्याचं सांगितलं जातं. लीवरची कार्यक्षमता वाढवणे तसेच लीवरची इतर त्रासांपासून सुटका करण्याचं काम देखील काही प्रमाणात लवंगकडून गेलं जात असल्याचं सांगितलं आहे.
शरीरातील वाढती चरबी हा अनेकांसाठी त्रासदायक ठरत असलेली बाब आहे. आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी नानाविध उपाय केले असतील, मात्र एकदा लवंगचा वापर करुन पाहा. तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्याचं काम लवंग करते. लवंगेचं पाणी तुम्ही पिऊ शकता. दिवसातून काही वेळा अशाप्रकारे लवंगेचं पाणी पिल्यास तुमच्या शरीरातील चरबीचं प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.


Post a Comment

0 Comments