Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

काेराेना झाल्यावर पुन्हा संसर्गाचा धोका खूप कमी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
काेराेना झाल्यावर पुन्हा संसर्गाचा धोका खूप कमी आहे. डेन्मार्कमध्ये विस्तृत स्तरावर केलेल्या अभ्यासात हे समोर आले आहे. त्यानुसार कोविड-१९ मधून बरे झालेले बहुतांश रुग्ण किमान सहा महिन्यांसाठी पुन्हा संसर्गापासून सुरक्षित होतात. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, ६५ वर्षांखालील लोकांमध्ये पुन्हा संसर्गाचा धोका ८०% कमी आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, पुन्हा संसर्ग झाला तर लक्षणे न दिसण्याची शक्यता आहे. कारण रोगप्रतिकार यंत्रणा विषाणूला वेगाने निष्क्रिय करते. त्यामुळे पहिल्यांदा लक्षणांसह संक्रमित झालेले लोक पुन्हा संक्रमित झाले तर त्यांच्यात कुठलीही लक्षणे न दिसण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे ज्यांना पुन्हा संसर्ग झाला आहे, त्यापैकी बहुतांश जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही.

Post a Comment

0 Comments