Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वांबोरी घाटात वाहन चालकांना अडवून त्यांना लुटणारी टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - राणीच्या वेळी वांबोरी घाटात वाहन चालकांना अडवून त्यांना लुटणारी टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. विकास बाळू हनवत (वय २४ , रा. पाण्याचे टाकीजवळ, कात्रड, ता. राहुरी), करण नवनाथ शेलार ( वय १९ , रा . विटभट्टीजवळ, मोरे चिंचोरे, ता. नेवासा) व एक अल्पवयीन साथीदार यांना वेगवेगळया ठिकाणावरुन पकडण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मित्रासह गोरक्षानाथ गड ( मांजरसुंबा) येथे त्यांची मोटारसायकल (एमएच१६, सीबी ३३२८) ही वरुन वांबोरी फाटामार्गे जात असतांना गोरक्षनाथ गडाचे चढावर मोटार सायकलचा वेग कमी झाला. त्यावेळी फिर्यादीचे समोरुन दोन व पाठीमागून दोन अश्या ४ अज्ञात इसम दोन मोटारसायकलवरुन जवळ आले व मला व मित्रास मारहाण करुन माझ्या व मित्राजवळील ३ मोबाईल व सोने चांदीचे दागीणे असा एकूण १ लाख १६ हजार ५०० रु . किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला, अशी रितीक प्रेमचंद छजलानी ( रा. पंचशीलनगर, भिंगार ) यांनी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरुन गुरनं . १२५४/२०२१ , भादवि कलम ३९४,३४ प्रमाणे दाखल करण्याचा आला होता. या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांना सदरचा गुन्हा हा विकास हानवत ( रा. कात्रड ता. राहुरी) याने व त्याचे साथीदाराने मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या.
कात्रड (ता. राहुरी) येथे जावून आरोपीचे ठावठिकाणाबाबत गोपनीय माहिती घेवून आरोपी विकास बाळू हनवत वय २४ , रा. पाण्याचे टाकीजवळ, कात्रड , ता . राहुरी) यास ताब्यात घेतले. त्याचेकडे सदर गुन्हया बाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली . त्यास अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार करण शेलार ( रा . मोरया चिंचोरे ता. नेवासा ), सुरेश निकम (रा . कात्रड ता . राहुरी) व दोन अल्पवयीन साथीदार अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. सदर माहितीच्या आधारे आरोपीतांचा शोध घेवुन आरोपी करण नवनाथ शेलार , (वय१९ , रा . विटभट्टीजवळ , मोरे चिंचोरे , ता . नेवासा) व एक अल्पवयीन साथीदार यांना वेगवेगळया ठिकाणावरुन ताब्यात घेतले. तसेच सुरेश निकम व एक अल्पवयीन साथीदार यांचा शोध घेतला पंरतु ते मिळुन आले नाही. ताब्यात घेतलेले आरोपी व अल्पवयीन साथीदार यांचेकडे सदर गुन्हयातील चोरलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हयातील चोरलेले मोबाईल व दागिणे साथीदार सुरेश निकम याचेकडे असल्याचे सांगीतले . ताब्यात घेतलेले आरोपी व अल्पवयीन साथीदार यांना विश्वासात घेवुन त्यांनी आनखी कोठे कोठे गुन्हे केले आहे. याबाबत विचारपुस केली असता त्यांनी गजराज नगर (अहमदनगर) व मोरया चिंचोरे शिवार (ता. नेवासा) या परिसरामध्ये वाहन चालकांना अडवून लुटमार केली असल्याची कबुली दिली आहे . त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नंबर 1 १३२/२०२१ भा.द.वि.कलम ३ ९ ५ व सोनई पोलीस स्टेशन गु.र.नंबर । १३१/२०२१ भा.द.वि.कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हे दाखल असून वरील नमुद आरोपी व अल्पवयीन साथीदार यांचेकडून चार मोटार सायकली , दोन मोबाईल , रोख रक्कम , गिलवर असा एकूण १,७३,७०० / - रु . किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
आरोपी विकास बाळु हानवत हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . १ ) शनिशिंगनापुर पो.स्टे . गु.र.नंबर 1 २६/२०१६ भा.द.वि.कलम ३७ ९ , ३४ २ ) सोनई पो.स्टे . गु.र.नंबर 1१४८/२०२० भा.द.वि.कलम ३ ९ ४,३४ ३ ) सोनई पो.स्टे . गु.र.नंबर 1 ३११/२०२० भा.द.वि.कलम ३ ९ ४,५०६.३४ ४ ) सोनई पो.स्टे . गु.र.नंबर 1५६/२०२० भा.द.वि.कलम ३ ९ ७.३ ९ ४,४२७,५०४,३४ ५ ) एमआयडीसी पो.स्टे . गु.र.नंबर 1 ३ ९ ७ / २०१ ९ भा.द.वि.कलम ३ ९ २,४११,३४ ६ ) एमआयडीसी पो.स्टे . गु.र.नंबर । ८६८/२०२० आम अॅक्ट कलम ४/२५ आरोपींना मुद्देमालासह एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे . पुढील कार्यवाही एमआयडीसी पोलिस करीत आहेत . 
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि.अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि मिथुन घुगे, पोसई गणेश इंगळे, सफौ नानेकर, पोहेकॉ हिंगडे, संदिप घोडके, मनोज गोसावी, पोना सुनिल चव्हाण, संदिप पवार, सुरेश माळी, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, दिपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, पोकॉ योगेश सातपुते, मच्छिद्र बर्डे, मेघराज कोल्हे, कमलेश पाथरुड, सागर सुलाने, आकाश काळे, रोहीत येमुल व मपोना भाग्यश्री भिटे, चापोहेकॉ संभाजी कोतकर, उमांकात गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments