Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार अंतर्गत राहाता तालुक्यात पंचायत समितीसह तीन ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार अंतर्गत राहाता तालुक्यातील पंचायत समितीसह तीन ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्या पंचायतराज संस्थांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते शनिवारी (दि.24) पुरस्कार देण्यात आले. यावेळी अध्यक्षा राजश्रीताई घुले व जि.प. ग्रा.पं.विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी उपस्थित पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच राहाता पंचायत समितीसह तिन्ही ग्रामपंचायत पदाधिकारी,सदस्य व अधिका-यांचे माजीमंञी राधाकृष्ण विखे पा, जि.प.मा.अध्यक्षा शालिनीताई विखे पा., खा.डाॅ. सुजय विखे पा., खा.सदाशिव लोंखडे आदिसह मान्यवरांनी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. 
पुरस्कार प्राप्त पंचायत राज संस्था यात जनरलमध्ये राहाता पंचायत समिती व राहाता तालुक्यातील ग्रामपंचायत चंद्रापूर, लोहगाव आणि ग्रामपंचायत विकास आराखडामधून लोणी बुद्रुक यांना पुरस्कार देण्यात आले आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी यासह पुरस्कार स्विकारण्यासाठी पंचायत समिती राहता सभापती नंदाबाई तांबे, उपसभापती ओमेश जपे पा., पंचायत समिती राहाता गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, ग्रामपंचायत चंद्रपूर सरपंच सौ प्राजक्ता घुले, ग्रामसेवक प्रतिभा पागीरे, ग्रामपंचायत लोहगाव सरपंच स्मिता चेचरे, ग्रामविकास अधिकारी रुक्‍मीणी सूर्यवंशी, ग्रामपंचायत लोणी बुद्रुक सरपंच कल्पना मैड, ग्राम विकास अधिकारी कविता आहेर आदीसह तिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य उपस्थित होत.
📩
केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्‍यवस्‍थापनाचा उत्‍कृष्‍ठ दर्जा राखल्‍यामुळे पंचायत समिती राहाता कार्यालयाला राष्ट्रीय पातळीवरील रक्कम रु .25लक्ष चा पुरस्कार
2)तसेच ग्रामपंचायत लोणी बु ला आमचा गाव आमचा विकास (GPDP )विषयक कामकाजाकरिता, 3) ग्रामपंचायत चंद्रापुर यांना सर्वसाधारण कामकाजाकरिता, 4) ग्रामपंचायत लोहगाव यांना सर्वसाधारण कामकाज व स्वच्छता विषयक कामकाजाकरिता, 5) वरील तीनही ग्रामपंचायतींना लोकसंख्येनुसार रक्कम रु 8 ते 12 लक्ष चा दीन दयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्‍कार 2021 मिळाला आहे. 6) वरील सर्व पुरस्कार सन 2019-20 मधील केलेल्या कामगिरीसाठी मिळाले आहेत .


Post a Comment

0 Comments