Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

देशात कोरोना भयंकर रूप धारण

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
देशात कोरोना भयंकर रूप धारण करत आहे. गेल्या एक दिवसात ९२,९४३ नवे रुग्ण आढळले. नव्या रुग्णांची ही जगातील सर्वाधिक संख्या आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र आता रोज ५० हजार रुग्णांचे राज्य होण्याच्या मार्गावर आहे.जगात ब्राझील व अमेरिकेतच महाराष्ट्रापेक्षा अधिक रुग्ण आढळताहेत. फ्रान्स-इटली या देशांतही रोज ४० हजारहून कमी रुग्ण आढळत आहेत. गुजरात, पंजाबसारख्या अनेक राज्यांत रुग्णसंख्येचे नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ४९,४४७ रुग्ण आढळले व २७७ मृत्यू झाले. तर, देशात ५१४ जणांचा मृत्यू झाला. देशात पूर्वीचा ‘पीक’ ओलांडण्याच्या स्थितीत ही संख्या आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्यांची संख्या निम्म्याहून कमी आहे. अन्य मोठ्या राज्यांत संसर्ग दर ५%हून अधिक आहे. हा अनियंत्रित श्रेणीमध्ये मोडताे, असे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.

देशात रोजचे कोरोना रुग्ण एक लाखाकडे... भारतात एका दिवसात 92,943 रुग्ण, जगात सर्वाधिक संख्या; देशात ९७ हजारांच्या मागील ‘पीक’ला मागे टाकण्याकडे वाटचाल

पुण्यात १२ तासांची संचारबंदी, अनेक राज्यांत शाळा बंद - पुण्यात सायंकाळी ६ पासून १२ तासांची संचारबंदी जाहीर केली आहे, तर राज्यात आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाईल. औद्योगिक ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णालयांना करण्याची तयारी सुरू आहे.
- द्रमुक खासदार कनिमोझी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.
- ओडिशात वाढते कोरोना रुग्ण पाहता पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर निर्जंतुक करण्यासाठी दर रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे. राज्यात १० जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी आहे.
- छत्तीसगडमध्ये आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्ग जिल्ह्यात स्थिती अत्यंत चिंताजनक हाेत चालली असून या जिल्ह्यात १०० कोराेना चाचण्यांत २९ लोकांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे.
- हिमाचलमध्ये १५ एप्रिलपर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहतील. स्पर्धा परीक्षांत सहभागी होण्यासाठी उमेदवाराची लेखी सहमती लागेल.
- उत्तर प्रदेशात ११ एप्रिलपर्यंत आठवीपर्यंतच्या सर्व शाळा बंद राहतील. बिहारमध्ये ८वीपर्यंतच्या शाळा ११ एप्रिलपर्यंत बंद.
- केंद्र सरकारने राज्यांना काही काळासाठी आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सना लसीसाठी नोंदणी करू नका, अशी सूचना केली आहे. काही अपात्र लोक याचा लाभ घेत होते. पूर्वी नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचारी व वर्कर्स तसेच ४५ वरील लोकांना डाेस दिले जातील.

आयपीएलही कचाट्यात
अक्षर व स्टेडियम स्टाफला कोरोना
- आयपीएल ९ एप्रिलपासून आहे. त्यात दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलला कोरोना झाला अन् तो विलगीकरणात आहे. दिल्लीचा सामना १० एप्रिल रोजी आहे.
- मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांपैकी ८ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.
- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर कोरोना नियम मोडला तर ५ हजार दंड.

बांगलादेशात सात दिवस लाॅकडाऊन- बांगलादेशात कोरोना नियंत्रणाबाहेर गेला आहे. यामुळे शेख हसीना सरकारने आता देशात ५ एप्रिलपासून एक आठवड्यांसाठी पूर्ण लॉकडाऊन जाहीर केला.

पुण्यात दिवसभरात १०,८२७ रुग्ण, ६६ मृत्यू - पुण्यात शनिवारी रुग्णसंख्यने नवा उच्चांक नोंदवला आहे. दिवसभरात तब्बल १०,८२७ नवे रुग्ण तर, ६६ मृत्यू झाले.  मराठवाड्यात ५,३७५ नवीन रुग्ण, तर ८१ जणांचा मृत्यू झाला. औरंगाबादेत १३९४ नवीन रुग्ण, २१ बाधितांचा मृत्यू झाला. विदर्भात शनिवारी ७७८५ नवे रुग्ण तर ७८ जणांचा मृत्यू झाला.Post a Comment

0 Comments