Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक संतप्त ; मेडिकल चालकास जबाब घेऊन पोलिसांनी सोडले

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर - केडगाव येथील नरेंद्र मेडिकल येथे रेमडेसीवीर इंजेक्शन घेण्यासाठी नागरिकांनी रविवारी (दि.11) गर्दी केली. या दरम्यान इंजेक्शन न मिळाल्याने नागरिक संतप्त झाले होते. या घटनेबाबत पोलीसांना माहिती मिळताच, यावेळी पोलिस वेळेत दाखल होऊन गर्दी पांगविण्यात आली. मेडिकल चालकास चौकशीसाठी कोतवाली पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.
 याबाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी सांगितले की, केडगाव येथील नरेंद्र मेडिकलमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीआधारे पोलीस कर्मचारी केडगाव येथे गेले होते. यानंतर मेडिकल चालक चोरडिया यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर चोरडिया यांनी शनिवारी रात्री 102 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होते. त्या इंजेक्शनची एमआरपी किंमत 5,400 रुपये असून, आम्ही 4 ते 4,500 रुपयांना ती इंजेक्शन विकले आहे. उपलब्ध इंजेक्शन संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना कागदपत्रे पाहून त्यांना विकल्याचे जबाबात चोरडिया यांनी सांगितले आहे. याबाबत अन्न औषध प्रशासन अधिकारी श्री राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, राञीतून नगर जिल्ह्यासाठी 1520 रेमडेसिवीर इंजेक्शन आले होते, अशीही माहिती पो.नि मानगांवकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments