Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरिया पाणबुडीतून क्षेपणास्त्र डागण्याच्या यंत्रणेचे परीक्षण करणार

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
टोकियो -  एकीकडे जग कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करू लागले आहे. उत्तर कोरियाने मात्र शस्त्रागार आणखी वाढवण्यावर भर दिला आहे. कोरिया लवकरच पाणबुडीतून क्षेपणास्त्र डागण्याच्या यंत्रणेचे परीक्षण करणार असल्याचे वृत्त आहे. तीन हजार टन वजनाच्या या पाणबुडीत तीन क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात.

प्रशांत महासागरात फेरफटका मारताना या पाणबुडीतून हवाई तसेच अमेरिकेच्या भूमीलादेखील लक्ष्य केले जाऊ शकते, असे तज्ज्ञांना वाटते. प्योंगयाँगच्या या निर्णयामुळे उत्तर-पूर्व आशिया आणि अमेरिकेच्या स्थैर्यासाठी धोका मानले जात आहे. वॉशिंग्टन डीसीच्या थिंक टँक द सिमोंस सेंटरचे तज्ज्ञ दीर्घकाळापासून उत्तर कोरियाच्या शिनपो शिपयार्डच्या या प्रकल्पावर बारकाईने नजर ठेवून आहेत. उत्तर कोरियाचा हा चार वर्षांपासून सुरू असलेला प्रकल्प आहे. आता पूर्णत्वाला आल्यासारखे वाटू लागले आहे. उपग्रहाच्या नव्या छायाचित्रातून हे स्पष्ट दिसते. एका हॉलमध्ये या पाणबुडीची बांधणी केली जात आहे. त्या हॉलच्या बाहेरील तयारी, नव्या पाणबुडीच्या सज्जतेची तयारी दर्शवणारी ही छायाचित्रे आहेत. अमेरिका व दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणाही निगराणी ठेवून आहेत. शिनपाेमधील प्रत्येक घडामोडीवर आमचे लक्ष आहे, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियाचे शासक किम जाेंग उन यांनी जुलै २०१९ मध्ये या शिपयार्डचा दौरा केला होता. उत्तर कोरियाजवळ सागरी किनारपट्टीवरून पुढे जाण्याचा अनुभव नाही. त्याशिवाय प्रशांत महासागराच्या तळाशी जाणे, हवामान बदल, लाटांची ताकद समजून घेण्याची पद्धत नाही. जपानचा पहारा कडक आहे.


Post a Comment

0 Comments