Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीत हनुमान जयंती साजरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
शिर्डी- हनुमान जयंतीनिमित्त येथील हनुमान मंदिरात शिर्डीतील स्थानिक युवक मोठ्या भक्तिभावाने सोशल डिस्टिंगचे नियम पाळून हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यावेळी येथील क्रांती युवक मंडळ आयोजित हनुमान जयंती उत्सव समिती -2021 तथा भाजप युवा मोर्चाचे मुख्य पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हनुमान जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.


हनुमान जयंती शिर्डीला हनुमान मंदिराचे विशेष महत्त्व आहे. साईबाबा स्वत: या मंदिरात येत असत, साईबाबा असतांना त्याचे नूतनीकरणही केले गेले होते.
आज कोरोना साथीच्या आजारामुळे या वर्षी देखील मंदिर प्रशासनाने साथीच्या आजारांचे नियमांचे पालन करून विधिवत पूजा केली.
शिर्डीतील युवक या दिवशी हनुमान मंदिरासमोर ठेवलेले 125 किलो वजनाचा बजरंग गोटा (दगड) उचलून शक्तीची पूजा करतो. प्रतिनिधीक स्वरूपात काही युवकांनी यात खंड पडू नये म्हणून १२० किलो बजरंग गोटा उचलून शक्तीरूपक हनुमानजीची पूजा केली.
आजच्या काही दिवस अगोदर आम्ही तरुणांनी मिळून चांदीची गदा बनविली, त्या गदेचे पूजन करून सर्व तरुण निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करतात. ही चांदीची गदा 11 किलोची बनवून मंदिरात अर्पण करण्याचा संकल्पही आहे.

Post a Comment

0 Comments