Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खंडणी मागणी करणारा अटक ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जीवे मारण्याची धमकी देऊन पन्नास लाख रुपये रकमेची खंडणीची मागणी करणाऱ्यास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. राहुल सुखदेव गायकवाड ( वय 31 रा. कोहक, ता. पारनेर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. या आरोपी गायकवाड याला पारनेर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मोबाईलवरून कुणीतरी अनोळखी जन वेळोवेळी फोन करून 'जिंदगी सहीसलामत जीना चाहता है तो पचास लाख रुपये देना ही पडेगा पोलीस के पास गया तो तेरी जान सौ टका जाएगी' अशी फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन 50 लाख रुपये रकमेची खंडणीची मागणी केल्याच्या गणेश सिताराम गायकवाड यांच्या दि. 19 मार्च 2021 रोजीच्या फिर्यादीवरून सुपा पोलिस ठाण्यात गोदावरी कलम 386, 506 प्रमाणे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी अधिक माहिती काढून व तांत्रिक तपास करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्याला पुणे येथे सापळा लावून पकडण्यात आले. आरोपी गायकवाड यांच्यावर यापूर्वी पारनेर, सुपा व छावणी औरंगाबाद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, सफौ नानकर, विश्वास बेरड, सुरेश माळी, रवी सोनटक्के, रणजित जाधव, रवींद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, मयुर गायकवाड, विजय धनेधर, मच्छिंद्र बर्डे, चापोहेकाँ चंद्रकांत कुसाळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments