Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या धर्मापुरी नाक्यावर प्रत्येक वाहनांची परळी ग्रामीण पोलिस प्रशासनकडून कसून चौकशी


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
परळी वैजनाथ - राज्यामध्ये कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे कालच मंत्री मंडळाची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये कडक लाँकडाऊनचे संकेत याच पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असल्याचे पाहायला मिळते.  परळी ते गंगाखेड रस्तावरील धर्मापुरी नाक्यावर पोलिस प्रत्येक येणाऱ्या वाहणांची कसून चौकशी करत आहे. ऐरवी पोलीसचे प्रमाण कमी असते मात्र आता पोलिसांचा फौज फाटा वाढविलेला आहे. आणि येणारा वाहन कसून चौकशी केली जात आहे. आणि नंतरच पुढे पाठविले जाते आहे. त्यानंतर एकदरीतच आता जिल्हा प्रशासन सतर्क झाल्याचे दिसत आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने धर्मापुरी नाक्यावर तैनात करण्यात आले आहेत.  

यावेळी.पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, पोलिस उपअधिक्षक सुनील जायभाये, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस उपनिरीक्षक मनोज जिरगे, पोलिस नाईक हरिदास गित्ते, शिवाजी गोपाळघरे, किशोर घोळवे, दिपक लव्हारे, किशोर गायकवाड, अनंत भोसले, गडदे आदी कर्मचारी बंदोबस्त तैनात होते.

Post a Comment

0 Comments