Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बेकायदेशीर दारूसाठा जप्त ; तोफखाना पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - बेकायदेशीर लपवून ठेवण्यात आलेला दारू साठ्यावर छापा टाकून जप्त करण्याची धडाकेबाज कारवाई तोफखाना पोलिसांनी गुरुवारी (दि.22) केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, राज्यात विक्रीस प्रतिबंध असताना अहमदनगर शहरातील भिस्ताबाग चौकातील वृद्धेश्वर पानस्टाॅलमध्ये एक जणाने देशी दारूचा साठा लपवून ठेवला होता. तो साठा बेकायदेशीर विक्री करीत असल्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस पी गायकवाड यांना खब-यामार्फत माहिती मिळाली होती. श्री गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार तोफखाना पोलिस पथकाने भिस्तबाग चौक येथे सापळा लावून शिवा गोपाळ शर्मा (वय 25, रा. श्रमिकनगर पाईपलाईन रोड,अहमदनगर ) याला ताब्यात घेतले. शर्मा याने लपवून ठेवलेला वृद्धेश्वर पान स्टाॅलमधील 47 हजार 424 रुपयाचे संजीवनी देशी दारूचे 19 बंद बॉक्स काढून दिले. शर्मा व त्याचा मालक काशिनाथ बबन शिंदे याच्याविरुद्ध पोकॉ शैलेश गोमसाळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि एस गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार तोफखान्याचे सपोनि पिंगळे, सफौ आढाव, पोहेकॉ काळे, पोकॉ शैलेश गोमसाळे, जावेद शेख, संतोष राठोड, चापोकाँ नरसाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments