Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्हा विश्वहिंदुपरिषद व बजरंगदल तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

                                             

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा मंत्र दिला-अँड.जय भोसले        
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर                           
अहमदनगर-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या आदर्श अश्या राज्यघटनेचे लेखन केले.त्यामुळे भारतीयांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.भाषण स्वातंत्र्य,व्यक्ती स्वातंत्र्य,समता आणि बंधुता हा मंत्र दिल्याने भारत हा जगातील बळकट लोकशाहीचा देश म्हणून उदयास आला आहे.असे प्रतिपादन विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अँड.जय भोसले यांनी केले.     

                           दिल्लीगेट येथील विश्वहिंदू परिषद कार्यालय,कुबेर गणेश मंदिर येथे नगर जिल्हा विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अँड.जय भोसले,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,मठ मंदिर समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे,मुकुल गंधे,सामाजिक समरसताचे ज्ञानेश्वर मगर,शहर सहमंत्री राजेंद्र चुंबळकर,अनिल राऊत आदी उपस्थित होते.
संकलन : -अमोल भांबरकर


Post a Comment

0 Comments