Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेमडेसिविर १,३०० रुपयांत; सात कंपन्यांशी चर्चा, सर्वत्र समान दर - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
 नगर रिपोर्टर 
 मुंबई - 
कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा राज्यात पर्याप्त ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत कंपन्यांशी चर्चा करून उत्पादनही वाढवायला लावले आहे. तसेच रेमडेसिविर कंपन्यांशी चर्चा करून या औषधाचे दर कमाल १३०० रुपये पर्यंत नियंत्रणात ठेवण्यात येतील, अशी ग्वाही राज्याो अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी दिली.
रेमडेसिविर औषधाची एमआरपी कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. या औषधाचे उत्पादन करणाऱ्या देशात एकूण ७ कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीची किंमत वेगळी आहे. काही कंपन्यांची किंमत आठशे तर काहींची कमाल किंमत साडेचार हजार असे आहे, असे डॉ.शिंगणे यांनी दूरध्वनीवर बोलताना सांगितले. औषधाची एमआरपी कमी करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. त्यानुसार एमआरपी कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. दोन दिवसात यासंदर्भातले आदेश जारी होतील. कोरोना चाचणीचे दर राज्य सरकारने कमी केले आहेत. तसे रेमडेसिविर औषधाचे दर नक्की कमी होतील आणि राज्यातील कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळेल, असे मंत्री शिंगणे यांनी स्पष्ट केले.

 

Post a Comment

0 Comments