Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मर्चंटस्‌ बँकेने सभासदांना लाभांश वाटपाचा निर्णय त्वरित घ्यावा : संचालक संजय चोपडा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : कोविड 19 महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली महामंदी लक्षात घेवून भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांना लाभांश वाटपास काही बंधने घातली होती. परंतु, आता खुद्द रिझर्व्ह बँकेने दि.22 फेब्रुवारी 2021 च्या परिपत्रकानुसार लाभांश वाटपास परवानगी दिली आहे. त्यानुसार अहमदनगर मर्चंटस्‌ बँकेनेही सभासदांना लाभांश वाटप करण्याचा विषय आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत घेवून त्यास मंजुरी द्यावी. काही अडचण असल्यास रिझर्व्ह बँकेशी सल्लमसलत करून परवानगी घेवून सर्व सभासदांना दिलासा द्यावा अशी मागणी मर्चंटस्‌ बँकेचे संचालक संजय चोपडा यांनी केली आहे.


याबाबत चेअरमन यांना दिलेल्या पत्रात चोपडा यांनी म्हटले आहे की, अहमदनगर मर्चंटस्‌ को. ऑप.बँकेला चांगले कर्जदार लाभलेले असल्याने बँक कायम नफ्यात राहिली आहे. संस्थेला सातत्याने ऑडिट अ वर्ग दर्जा मिळत असतो. चांगल्या नफ्याची परिस्थिती लक्षात घेवून तसेच एकूण इतरत्र असलेले आर्थिक मंदीचे सावट लक्षात घेवून लाभांश वाटप केले पाहिजे. याबाबत मी 15 ऑक्टोबर 2020 रोजीच लाभांश वाटप करण्याबाबत पत्र दिले होते. मी सद्हेतूने दिलेल्या या पत्राची योग्य दखल घेणे अपेक्षित असताना त्यावेळी माझ्यावर वर्तमान पत्रातून टिका करण्यात आली. बँकेचे व सभासदांचे हित जोपासण्याच्या माझ्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेतली न गेल्याने मी व्यथित झालो होतो. त्यावेळी लाभांश वाटपास रिझर्व्ह बँक परवानगी देणार नाही, असे कारण देत माझी मागणी फेटाळून लावण्यात आली होती. परंतु, आता सत्याचा विजय झालेला असून रिझर्व्ह बँकेनेचे परिपत्रक काढून लाभांश वाटपास परवानगी दिली आहे. त्यादृष्टीने बँकेने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments