Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यातील कर्ज घेऊन न भरणाऱ्या ग्रामपंचायतींना नोटिसा !

 

17 ग्रामपंचायतीने कर्ज घेऊन एकही हप्ता भरला नाही : पाथर्डी - शेवगाव ( चिंचपूर पांगुळ, टाकळीमानुर, करंजी, शहर टाकळी), पारनेर - (हंगा, भाळवणी, गोरेगाव, कानूर पठार), श्रीगोंदा- (पारगाव सुद्रिक), जामखेड - (साकत, आरणगाव), नगर - (गुंडेगाव, रतडगाव), नेवासा - (वडुले, भेंडा खुर्द, सोनई)
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्हा ग्राम विकास निधी अंतर्गत दि.28 फेब्रुवारी  2021 अखेर 10 वर्षांआतील ग्रामपंचायतींनी घेतलेल्या कार्जचा घेतल्यापासून अद्यापपर्यंत एकही हप्ता न भरल्याने ग्रामपंचायतींच्या कर्जाच्या व्याजाचा बोजा वाढला आहे. त्या संबंधित ग्रामपंचायतींना कर्ज भरण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण 17 ग्रामपंचायतींनी कर्ज घेतल्यापासून अद्यापपर्यंत एकही रुपया भरला नसल्याने त्यासंबंधित ग्रामपंचायतीच्या कर्जाच्या व्याजाच्या आकड्यांत वाढ होत असल्याची माहिती सूञांनी दिली आहे.


जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत कर्जाची दि. 28 फेब्रुवारी 2021 अखेर 10 वर्षाआतील तालुकानिहाय घेतलेल्या कर्जाच्या तारखेपासून कर्जाचा एकही रुपया न भरलेल्या एकूण 17 थकित ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीने जिल्हा ग्राम विकास निधी अंतर्गत घेण्यात आलेल्या कर्जाची दहा हप्त्यांमध्ये दहा वर्षांमध्ये परतफेड करायची आहे कर्ज देतानाच प्रथम व्याजाची वसुली केली जाते परंतु ग्रामपंचायतीने घेतलेल्या कर्जाच्या दिनांकापासून दहा ते समान मासिक हप्त्यात भरण्यात आले तर पाच टक्के व्याज मिळते किंवा कर्जाचे हप्ते दिलेल्या वेळेत न भरल्यास 2.5 टक्के दंडात्मक व्याज ग्रामपंचायतींना आकारले जाते. हे कर्ज केवळ ग्रामपंचायत विकास कामात भरीव कामे व्हावीत या प्रमुख हेतूने हे कर्ज ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिले जात असते. 

दि. 28 फेब्रुवारी 2021 अखेर दहा वर्षाच्या आतील तालुकानिहाय ग्रामपंचायतीने घेतलेल्या कारणासाठी चे कर्ज व दिनांक व रक्कम याप्रमाणे
 पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतीने दि.12 जुलै 2017 मध्ये मंगल कार्यालयासाठी 14,00000 रुपये कर्ज घेतले आहे. करंजी ग्रामपंचायतीने मंगल कार्यालयासाठी दि.26 डिसेंबर 2018 मध्ये 29,90000 रुपये कर्ज घेतले आहे. टाकळीमानुर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयासाठी दि.25 मार्च 2018 मध्ये 3,75000 रुपये कर्ज घेतले आहे.
शेवगाव- शहर टाकळी ग्रामपंचायत कार्यालयासाठी दि.11 मार्च 2017 मध्ये 2,90000 कर्ज घेतले आहे. अमरापूर ग्रामपंचायतीने शॉपिंग सेंटरसाठी दि.8 मे 2018 मध्ये 10,00000 कर्ज घेतले आहे.
पारनेर तालुक्यातील हंगा ग्रामपंचायतीने शॉपिंग सेंटरसाठी दि.12 सप्टेंबर 2012 मध्ये कर्ज घेतले आहे. भाळवणी ग्रामपंचायतीने अंतर्गत रस्त्यासाठी दि.18 ऑगस्ट 2012 मध्ये 1657500 रुपये कर्ज घेतले आहे. गोरेगाव ग्रामपंचायतीने अंतर्गत रस्त्यासाठी दि. 18 ऑगस्ट 2011 मध्ये 15,00000 कर्ज घेतले आहे. कानूर पठार ग्रामपंचायतीने अंतर्गत रस्त्यासाठी दिनांक 21 फेब्रुवारी 2013 मध्ये 29,00000 रुपये कर्ज घेतले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक ग्रामपंचायतीने कार्यालयासाठी दि. 15 फेब्रुवारी 2003 मध्ये 11,00000 रुपये कर्ज घेतले आहे.
नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतीने कार्यालयासाठी दिनांक 19 जानेवारी 2015 मध्ये 1124000 रुपये कर्ज घेतले आहे. रतडगाव ग्रामपंचायतीने मंगल कार्यालयासाठी दि. 13 ऑक्टोबर 2017 मध्ये 10,15000 रुपये कर्ज घेतले आहे. 
जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायतीने अंतर्गत रस्त्यासाठी दिनांक 21 एप्रिल 2014 मध्ये 20,65रुपये कर्ज घेतले आहे. वरणगाव ग्रामपंचायतीने अंतर्गत रस्त्यासाठी दि.10 एप्रिल 2014 मध्ये 15,90000 रुपये कर्ज घेतले आहे.
नेवासा तालुक्यातील वडुले ग्रामपंचायतीने अंतर्गत रस्त्यासाठी दि. 10 फेब्रुवारी 2011 मध्ये 487500 रुपये कर्ज घेतले आहे. भेंडा खुर्द ग्रामपंचायतीने पीव्हीसी बंदिस्त गटारीसाठी दि. 17 डिसेंबर 2017 मध्ये 540000रुपये कर्ज घेतले आहे. सोनई ग्रामपंचायतीने शॉपिंग सेंटरसाठी दि.3 ऑगस्ट 2018 मध्ये 14,50,000रुपये कर्ज घेतले आहे. 
जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतीने मंगलकार्यालय, शॉपिंग सेंटर, अंतर्गत रस्ते, ट्रॅक्टर खरेदी, ग्रामपंचायत कार्यालय, सांस्कृतिक भवन यासह विविध कामांसाठी जिल्हा ग्राम विकास निधी अंतर्गत कर्ज घेतले आहे. या अन्य ग्रामपंचायतींनी घेतलेल्या कर्जाची काही रक्कमेचा हप्ते न भरणा-या त्या संबंधित ग्रामपंचायतींना कर्ज भरणा करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेतील सूत्रांकडून समजते.

Post a Comment

0 Comments