Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन  ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई : कोरोनामुळे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तातडीने त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज दुपारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.   
सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक नव्याने पुन्हा रंगभूमीवर सादर झाले. या नाटकातील ‘राजा’ची भूमिका तसेच दिलीप प्रभावळकर यांनी लोकप्रिय केलेले ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने रंगभूमीवर सादर झाले. यात प्रभावळकर यांची भूमिका नांदलस्कर यांना साकारायची संधी मिळाली. व्यावसायिक रंगभूमीवर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवले.
नांदलस्कर यांचा महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारली होती.

Post a Comment

0 Comments