Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पो. कुंडलिक आव्हाड यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान

 

👉विनाअपघात 20 वर्ष उत्कृष्ट कामगिरी 
👉25 वर्षात 61 वेळा रक्तदान
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील महाराष्ट्र पोलिस विभागात शिवडी पोलिस ठाण्यात पोलीस चालक या पदावर कार्यरत असणारे कुंडलिक किसन आव्हाड यांना नुकतेच पोलीस महासंचालक पदक पोलीस विभागाच्या वरिष्ठांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पोलीस कुंडलिक आव्हाड हे मुंबईत गेल्या 25 ते 30 वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत.

मूळचे ते चिंचपूर पांगुळ (ता.पाथर्डी जि.अहमदनगर) येथील रहिवासी आहेत. सध्या मुंबई शिवडी पोलीस ठाण्यात पोलीस चालक या पदावर कार्यरत आहेत. श्री आव्हाड यांनी मुंबई पोलिस दलामध्ये गेली 20 वर्षापासून उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने तसेच कार्यरत असताना विनाअपघात सेवा करून गेल्या 25 वर्ष सलग त्यांनी 61 वेळा रक्तदान केले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे श्री आव्हाड यांना महाराष्ट्र पोलीस दलामार्फत पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
श्री आव्हाड यांना पोलीस महासंचालक पदक मिळाल्याने त्यांचे चिचपुर पांगुळ ग्रामस्थांसह पाथर्डी तालुक्यातील राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments