Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ऑक्सिजन रिफीलर,उत्पादकाच्या ठिकाणी ऑक्सिजन आणण्यासाठी फक्त प्राधिकृत व्यक्तींनाच पाठविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे खाजगी रुग्णालयांना आदेश

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर: जिल्हयात सदयस्थितीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून ऑक्सिजन बेड, आयसीयु व व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने मेडीकल ऑक्सिजनची मागणी वाढलेली आहे. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजनचे सिलिंडर रिफिलर अथवा उत्पादक यांच्याकडून भरून आणण्यासाठी फक्त प्राधिकृत व्यक्तींनाच पाठवावे. रुग्णालयांनी ॲडमिट असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना त्यासाठी पाठवू नये असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले आहेत.
काही रुग्णालयामध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णांचे नातेवाईकांना ऑक्सिजनचे सिलेंडर रिफीलर/उत्पादक यांचेकडून भरून आणणेबाबत सांगण्यात येते. ही बाब अयोग्य असुन त्यामुळे रिफीलर/उत्पादक ठिकाणी अनावश्यक गर्दी होते. तथापि, रुग्णालयानी त्यांच्या कर्मचा-याला ऑक्सिजन सिलेंडर आणण्याकरीता प्राधिकृत करावे. या प्राधिकृत व्यक्तीस प्राधिकार पत्राशिवाय रिफीलर/उत्पादकचे ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर भरुन मिळणार नाही याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments