Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिल्ली व मुंबई संघात चुरशीची लढाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
IPL च्या 14 व्या मोसमातील 13वा सामना डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियंस (MI) आणि दिल्ली कपिटल्स (DC)दरम्यान चेन्नईमध्ये सुरू आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्लीकडे मागच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा हिशोब चुकता करण्याची सधी आहे. 
रोहितने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. एडम मिल्नेच्या जागी जयंत यादवला संधी दिली आहे. तर, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने दोन बदल केले आहेत. लुकमान मेरीवाला आणि क्रिस वोक्सऐवजी शिमरोन हेटमायर आणि अमित मिश्राला संधी दिली आहे.
दोन्ही संघातील परदेशी खेळाडू
मुंबईच्या प्लेइंग-11 मध्ये क्विंटन डिकॉक, कीरोन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट सामील आहे. तर, दिल्लीमध्ये स्टीव स्मिथ, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर आणि कगिसो रबाडा आहेत.
मागील मॅचमध्ये दोन्ही संघांमध्ये 4 सामने झाले होते. त्या सर्वसामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केला होता. दोन्ही संघात मागच्या वर्षीचा अंतिम सामना झाला होता, त्यातही मुंबईने पाच गडी राखून दिल्लीचा धुवा उडवला होता. मागच्या सीजनमध्ये दिल्ली पहिल्यांदा अंतिम फेरीत आली होती. त्यामुळे दिल्लीकडे त्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची सधी आली आहे.
दोन्ही संघ - दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, कगिसो रबाडा, अमित मिश्रा आणि आवेश खान.
मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कीरोन पोलार्ड, राहुल चाहर, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह

Post a Comment

0 Comments