नगर रिपोर्टर
अहमदनगर - जामखेड रोडवर सारोळा बद्धि शिवारात विश्व भारती कॉलेज जवळ हॉटेल एल आर मध्ये 26 हजार 320 रु किमतीची देशी विदेशी दारू साठा नगर तालुका पोलिसांनी जप्त केली आहे. ऋषिकेश लक्ष्मण बोरुडे (रा. सारोळा बद्धी ता. जि अहमदनगर), वसीम अक्रम शहीदूल शेख (रा. पतरादोह जी नादिया राज्य पश्चिम बंगाल हल्ली रा. सारोळा बद्धी ता. जि. अहमदनगर ) असे पकडले.
पोकॉ संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वेय 65(ई) प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेद्र सानप यांच्या सूचनेनुसार नगर तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
0 Comments