Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 


आदिवासी संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश - प्रसाद शिंदे
 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर: आदिवासी समाजासाठी असणारी खावटी योजना शासन निर्णय 26 मार्च21 रोजी मंजूर करून या योजनेसाठी निधी देखील वितरित झाला आहे. यासंदर्भात ऑगस्ट 2020 रोजी शासन बैठकीत खावटी योजना कार्यान्वित करण्यासाठी मान्यता मिळाली होती तेव्हा पासून यासंदर्भात आदिवासी संघर्ष समिती जिल्हा सरचिटणीस प्रसाद शिंदे  सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून खावटी योजना     आदिवासी बांधवांना लवकरात लवकर  मिळण्यासाठी निवेदने देण्यात आली तसेच सदर योजनेच्या संदर्भात आदिवासी बांधवांनी मध्ये जनजागृती करण्यात आली. यासंदर्भात शिंदे यांनी अधिक माहिती सदर योजनेचा लाभ पुढील बांधवांना मिळणार आहे. मनरेगा वर एक दिवस  कार्यरत असलेले आदिवासी मजूर आदिम जमाती ची सर्व कुटुंबे ,पारधी जमातीची सर्व कुटुंबे, जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे यामध्ये ,परितक्त्या घटस्फोटीत, महिला विधवा भूमिहीन ,शेतमजूर ,अपंग व्यक्ती असलेले कुटुंब ,अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब वैयक्तिक वनहक्क धारक कुटुंब या सर्व कुटुंबांना थेट दोन हजार रुपये रक्कम बँक खात्यावर जमा होणार आहे तसेच आवश्यक आवश्यक अन्नधान्य किट वाटप गाव शहर पातळीवर होणार आहे तशा सूचना स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आलेले आहे याबाबतीत सर्व आदिवासी  आदिवासी  समाजाच्या वतीने शासनाचे आभार मानण्यात आले आहे याबाबत शिंदे यांनी सांगितले की सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी आदिवासी संघर्ष समिती नियमित प्रयत्न करणार आहेत या पाठपुराव्याची मध्ये मंगेश शिंदे जिल्हाध्यक्ष , गणेश खोकले स्वप्नील गायकवाड ,योगेश गायकवाड ,दिलिप पवार, व सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments