Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे अटक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - राहुरी येथील पञकार रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडने अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला गु.र.नं.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी (वय 25 रा. जुने बसस्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी) व तोफिक मुक्तार शेख (वय 21 रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. श्री मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य. आरोपी कान्हो गंगाराम मोरे (वय 46) यास नगर औरंगाबाद जाणारे रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त येथून शिताफीने अटक केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, सपोनि योगेश देशमुख, सफौ. राजेंद्र आरोळे, पोहेकाँ सुरेश औटी, पोकॉ नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments