Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरला ऑक्सीजनचा साठा उपलब्ध : जिल्हाधिकारी भोसले

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर - जिल्ह्यासाठी 60 टन ऑक्सीजन साठा पुरविण्याची मागणी राज्य सरकारकडे नोंदविण्यात आली आहे. यापैकी 15 टन ही जिल्हा ग्रामीण रुग्णालयसाठी, 45 टन हे खाजगी रुग्णालयसाठी असून, यात ही ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करून देताना काही नियम-अटी लागू करण्यात आल्या आहेत. तशा सूचना या वैद्यकीय क्षेत्रातील संबंधितांना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

यापूर्वी खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याचे माहिती दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार ऑक्सिजनची टँकर उपलब्ध झाले आहेत. परंतु ही टॅंकर येताना शिक्रापूर, रांजणगाव येथे नागरिकांनी अडवली होती. पण नगर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत विभागीय आयुक्त व आरोग्य विभागाचे सचिव यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानुसार त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन ते ऑक्सिजनचे टँकर नगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.
19 टन अधिक 19 टन ऑक्सीजन साठा पुरविण्यातची मागणी केली आहे. जिल्ह्यात कायम ऑक्सीजन पुरवठा चालू आहे. जिल्ह्यात 20 हजाराच्यावर रुग्ण असून ऑक्सिजनच्या तुटवडा भरून काढण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत असून, यासाठी नगर जिल्हा प्रशासन राज्य शासनाच्या संपर्क आहे, असे श्री भोसले यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments