Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बनावट पोलीस बनून 'ती' कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांकडून करायाची वसुली !

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मध्यप्रदेश - बनावट पोलिस वर्दी घालून महिला पोलीस बनून नागरिकांकडून वसुली करत होती. महिला मास्क घालून कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांना नियमाची भाषा सांगून त्यांना धमकावून त्यांच्याकडून दंडाच्या नावाखाली पैसे घेत होती. हे केवळ फळ विक्रेतेच्या माहितीवरून त्या बनावट पोलीस महिलेस पकडण्यात आलेल्याची घटना रतलाम जिल्ह्यात घडली आहे.

रतलाम या ठिकाणी विवाहित महिला नकली पोलीस बनली होती. ती महू रोडवरील बसस्थानकावर मास्क लावून काही दिवसांपासून दुकानदार व बसमध्ये चढत असणा-या प्रवाशांकडून वसूली करत होती. या महिलेचा फळ विक्रेत्या महिलेला संशय आला. त्या महिलेने याची माहिती प्रशासनाला दिली. त्यानंतर या महिलेला पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. 


ही महिला पोलिसांची वर्दी घालून मास्क घालून रोडवेड बस स्टॅंडवर वसुली करत होती. पकडली गेल्यावर तिने सांगितले की, ती जावरा येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. तिने तिचं नाव निकीता सांगितलं. या महिलेची सध्या चौकशी सुरू आहे. 
बनावट महिला पोलिस ही महापालिकेच्या चालान कापणाऱ्या पथकाच्या कर्मचाऱ्यांसोबत गेल्या ५ ते ६ दिवसांपासून मास्क लावून नागरिकांकडून पैसे वसूल करत होती. 
 


Post a Comment

0 Comments